शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

मोहुर्ली येथे जनजागरण मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 23:09 IST

जिल्हा पोलीस प्रशासन, महसूल विभाग आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने मोहुर्ली पर्यटन संकुल येथे शुक्रवारी जनजागरण मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात नागरिकांना योजनांची माहिती देण्यात आली.

ठळक मुद्देपोलीस प्रशासनाचे आयोजन : नागरिकांना दिली योजनांची माहिती

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : जिल्हा पोलीस प्रशासन, महसूल विभाग आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने मोहुर्ली पर्यटन संकुल येथे शुक्रवारी जनजागरण मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात नागरिकांना योजनांची माहिती देण्यात आली.मेळाव्याला प्रमुख उपस्थिती म्हणून उपविभागीय अधिकारी मनोहर गव्हाळ, पोलीस उपअधीक्षक बजरंग देसाई, अंगणवाडी पर्यवेक्षिका शिला जुमडे, आदिवासी विकास निरीक्षक डी. एस. पडगलेवार, मंडळ अधिकारी रमेश आवारी, वनपरिक्षेत्र अधिकारी डी. ए. राऊत यांची उपस्थिती होती.या मेळव्यात जि.प. उच्च प्राथमिक शाळा मोहुर्ली, संत गाडगेबाबा विद्यालय मोहुर्ली, स्वराज्य जागृती समिती ताडाळी यांनी स्वागत गीत, आदिवासी नृत्य, दारू बंदीवर पथनाट्य तसेच संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंती निमित्त स्वच्छतेवर सादरीकरण करण्यात आले. तसेच पोलीस बँड पथकातर्फे राष्टÑगीतावर जनजागृती करण्यात आली. सायबर सेलतर्फे सायबर गुन्ह्याबाबत, महिलावर होणाºया अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार बाबत, वाहतुक नियमांसंबंधी मार्गदर्शन करण्यात आले.मेळाव्या दरम्यान महसूल विभाग, वन विभाग, आरोग्य विभाग, बाल कल्याण विभाग व पोलीस विभागातर्फे शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.मेळाव्यामध्ये मोहुर्ली प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनींना लगोरी व स्किपींग, व्हॉलीबॉल व किट तसेच ग्राम जुनोना येथील क्रिकेट टिमला क्रिकेट किट, पोलीस भरतीचे पूर्व तयारी करणाºया मुलांना पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण माहिती पुस्तिका वाटप करण्यात आले. तसेच मोहुर्ली आणि जुनोना येथील पोलीस पाटील यांचा सत्कार करण्यात आला.