१९ ते २५ एप्रिलपर्यंत नागभीडमध्ये जनता कर्फ्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:27 IST2021-04-18T04:27:15+5:302021-04-18T04:27:15+5:30
या काळात शासकीय कार्यालये, औषधी दुकाने व दवाखाने वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत. तहसीलदार मनोहर चव्हाण यांनी शनिवारी ...

१९ ते २५ एप्रिलपर्यंत नागभीडमध्ये जनता कर्फ्यू
या काळात शासकीय कार्यालये, औषधी दुकाने व दवाखाने वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत. तहसीलदार मनोहर चव्हाण यांनी शनिवारी प्रमुख अधिकारी व पदाधिकारी यांची बैठक घेतली. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
नागभीड नगरपरिषद क्षेत्रात व संपूर्ण तालुक्यात कोरोना विषाणूंचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर वाढत असून, हा वाढता प्रभाव रोखण्यासाठी व साखळी तोडण्यासाठी या जनता कर्फ्यूचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत नगरपरिषद क्षेत्रातील शासकीय कार्यालये, मेडिकल, पॅथालॉजी, दवाखाने आदी आस्थापने वगळून इतर सर्व आस्थापना, दुकाने, मिरची सातरे, बांधकामे पूर्णपणे बंद राहतील. या कालावधीत आस्थापना, दुकाने सुरू ठेवल्यास दंडात्मक कारवाई करून, सदर दुकाने आस्थापना कायमस्वरूपी बंद करण्यात येतील, अशी माहिती तहसीलदार मनोहर चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.