शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
3
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
4
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
5
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
6
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
7
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
8
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
9
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
10
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
11
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
13
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
14
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
15
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
16
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
17
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
18
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
19
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
20
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

चंद्रपूर, बल्लारपुरात ‘जनता कर्फ्यू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 5:00 AM

जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पार पडलेल्या बैठकीत व्यापारी असोसिएशन तसेच लोकप्रतिनिधींच्या सर्वसंमतीने ‘जनता कर्फ्यू’ चा निर्णय घेण्यात आला होता. चंद्रपूरच्या महापौर राखी कंचर्लावार, बल्लारपूर नगर परिषदेचे अध्यक्ष हरीश शर्मा यांनी शहरातील वाढत्या कोरोना संसर्गाची माहिती देवून ‘जनता कर्फ्यू’ची आवश्यकता मांडली होती.

ठळक मुद्देआजपासून चार दिवस ठप्प : रूग्णालय, औषधालय सुरू राहणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. सामूहिक संसर्गाची लक्षणे दिसत असल्याने कोरोनाचा केव्हाही उद्रेक होऊ शकतो. त्यामुळे ही साखळी तोडण्यासाठी चंद्र्रपूर महानगरपालिका क्षेत्र व दुर्गापूर, पडोली, ऊर्जानगर तसेच बल्लारपूर शहरात १० सप्टेंबर गुरूवार ते १३ सप्टेंबर रविवारपर्यंत ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केले आहे.जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पार पडलेल्या बैठकीत व्यापारी असोसिएशन तसेच लोकप्रतिनिधींच्या सर्वसंमतीने ‘जनता कर्फ्यू’ चा निर्णय घेण्यात आला होता. चंद्रपूरच्या महापौर राखी कंचर्लावार, बल्लारपूर नगर परिषदेचे अध्यक्ष हरीश शर्मा यांनी शहरातील वाढत्या कोरोना संसर्गाची माहिती देवून ‘जनता कर्फ्यू’ची आवश्यकता मांडली होती. चंद्रपूर चेंबर ऑफ कॉमर्स संघटनेचे अध्यक्ष हर्षवर्धन सिंघवी, चंद्रपूर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सदानंद खत्री व सर्व पक्षाच्या प्रतिनिधींनीही शहरातील स्थितीची माहिती दिली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मनपा आयुक्त राजेश मोहिते, बल्लारपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी सरनाईक आदींनी मते जाणून घेतली. त्यानंतर जनता कर्फ्यू लावण्यावर सर्वांचे एकमत झाले.बल्लारपुरात नऊ पथक सज्जजनता कर्फ्यू कालावधीत प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन होवू नये, यासाठी बल्लारपुरात महसूल, पोलीस व नगर परिषद प्रशासनाकडून नऊ पथक सज्ज ठेवण्यात आले आहेत. उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हाळे, मुख्याधिकारी विजयकुमार नाईक, तहसीलदार जयंत पोहनकर, ठाणेदार एस. एस. भगत यांच्या उपस्थितीत बुधवारी व्यापारी, सर्वपक्षीय नेते व लोकप्रतिनिधींची बैठक झाली.चंद्रपुरातील सीए कार्यालये बंदचंद्रपूर चार्टर्ड अकाऊंन्टट असोसिएशननेही कोरोनाविरूद्ध १० ते २० सप्टेंबरपर्यंत कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत घेतला आहे. यावेळी सीए असोसिएशनचे दामोधर सारडा, रमेश मामीडवार, अंजुम गौस, सौरभ खोसला, शादाब चिनी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. चंद्रपूरकरांनी घेतलेला ‘जनता कर्फ्यू’चा निर्णय योग्य आहे. त्यामुळे नागरिकांनी जिल्हा व स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन चंद्रपूर सीए असोसिएशनने केले आहे.काय सुरू राहणार ?सर्व रूग्णालये, औषधालये, कृषी केंद्र, शासकीय कार्यालय तसेच एमआयडीसीमधील सर्व आस्थापना, वेकोलि सुरू राहतील. दूध वितरण, पार्सल सुविधा, सर्व पेट्रोल पंप, वर्तमानपत्रांचे वितरण सुरू राहणार आहे. बँका फक्त अंतर्गत कामकाजासाठी सुरू असतील परंतु ग्राहक सेवेसाठी बंद ठेवण्यात आले आहे.सराफा बाजार आठ दिवसांसाठी ‘लॉकडाऊन’कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून चंद्रपुरातील सराफा व्यावसायिकांनी बुधवारपासून स्वत:हून ‘लॉकडाऊन’ सुरू केले. १६ सप्टेंबरपर्यंत सराफा प्रतिष्ठाने बंद राहणार आहेत. मंगळवारी पहिल्याच दिवशी शहरातील सराफा दुकाने बंद होती. त्यामुळे सराफा दुकानांसमोर शुकशुकाट होता.काय बंद राहणार ?चंद्रपूर मनपा क्षेत्र व दुर्गापूर, पडोली, उर्जानगर तसेच बल्लारपूर शहरातील सर्व किराणा, भाजी, फळे दुकाने, पान ठेले, चहा टपऱ्या व फुटपाथवरील सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे. जनतेने विनाकारण घराबाहेर निघू नये, मास्क वापरावे व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री विजय वडेट्टीवार व जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले.