जय हिंदचा नारा मनाला उर्जा देणारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:28 IST2021-01-25T04:28:37+5:302021-01-25T04:28:37+5:30
चंद्रपूर : नेताजीच्या नावाने प्रसिद्ध असलेले सुभाषचंद्र बोस यांनी सशस्त्र क्रांतीद्वारे भारताला स्वतंत्र करण्यासाठी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. ...

जय हिंदचा नारा मनाला उर्जा देणारा
चंद्रपूर : नेताजीच्या नावाने प्रसिद्ध असलेले सुभाषचंद्र बोस यांनी सशस्त्र क्रांतीद्वारे भारताला स्वतंत्र करण्यासाठी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. ‘जय हिंद’चा नारा देत त्यांनी नवक्रांतीच्या लढ्याला सुरुवात केली. त्यांचा हा नारा आजही मनाला ऊर्जा देणारा आहे. अशा महापुरुषाची जयंती साजरी करत असताना त्यांचे विचारही आत्मसात करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त बंगाली कॅम्प येथील नेताजी चौक येथे कार्यक्रम पार पडले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक विश्वजित शहा, तुषार शोम, यंग चांदा ब्रिगेडचे नितीन शहा, रमेश सरकार, बलराम शहा, गोपी मित्रा, प्राणनाथ राजवर्षी, जे. के. राजवंशी, कमलेश दास, निताई घोष, आशिक हुसेन, पीयूष मंडल, डॉ. विधान बिश्वास, अमोल हलदर, प्रदीप शहा, बलराम शहा, यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी बोलताना आमदार जोरगेवार पुढे म्हणाले, बंगाली कॅम्प येथील मॉं श्री दुर्गा काली माता मंदिर यांच्या वतीने मंदिर परिसरात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा बसविण्यात येणार आहे. या परिसराच्या सौदर्यीकरणासाठी पाच लाख तर त्यांच्या वाचनालयासाठी दोन लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.