जाधव कुटुुंबीयांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या
By Admin | Updated: November 6, 2014 22:53 IST2014-11-06T22:53:36+5:302014-11-06T22:53:36+5:30
पुरोगामी महाराष्ट्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील दलित कुटुंबातील तिघांची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या आरोपींना फाशी द्यावी, या मागणीसाठी सावली

जाधव कुटुुंबीयांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या
मागणी : सावली तालुका रिपाइंच्यावतीने धरणे व निषेध आंदोलन
उपरी : पुरोगामी महाराष्ट्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील दलित कुटुंबातील तिघांची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या आरोपींना फाशी द्यावी, या मागणीसाठी सावली येथे रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया तालुका सावलीच्या वतीने निषेध व धरणे आंदोलन करण्यात आले. रिपाइं चंद्रपूरचे जिल्हा उपाध्यक्ष नेताजी बुरचुंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या धरणे आंदोलनात उपस्थित सर्वच नागरिकांनी गुन्हेगारांना पकडून फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.
सावली तालुक्यातील कापसी येथे सिद्धार्थ खोब्रागडे व त्यांच्या पत्नीवर गावातीलच काही नागरिकांनी हल्ला करुन मारहाण केली. मात्र हल्लेखोरांवर कोणतीच कार्यवाही झाली नाही. या प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करण्यात यावी, शिवाय कोंडेखल, घोडेवाही, किसाननगर व भट्टीजांब येथील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी पुरवठा करण्यास दिरंगाई केल्याने व अतिक्रमीत जमीनधारकांना पैसे घेऊन पाणी दिले आणि सिंचन लागू असलेल्या २०० ते २५० एकर शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सावली येथील सिंचाई उपविभागाचे अभियंता बांडे व शाखाधिकारी धात्रक यांना निलंबित करण्यात यावे, त्यांच्याकडून नुकसान झालेल्या शेतीची नुकसानभरपाई वसुल करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
शिष्टमंडळाने सावलीचे तहसीलदार यांच्या मार्फतीने राज्यपाल मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना निवेदन दिले. शिष्टमंडळात चंद्रपूर रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष नेताजी बुरचुंडे, गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष अॅड. राम मेश्राम, चंद्रपूरचे महासचिव गोपाल रायपूरे, संघटन सचिव प्रदीप रामटेके, ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत खुशाल तेलंग, विदर्भ प्रदेशचे महासचिव सिद्धार्थ सुमन, गडचिरोलीचे कार्याध्यक्ष अॅड. शांताराम उंदिरवाडे, पिरिपा गडचिरोलीचे अध्यक्ष मुनेश्वर बोरकर, सावली तालुका अध्यक्ष दे. रा. बोरकर, सचिव किशोर उंदिरवाडे, संघटक देवीदास भैसारे, भद्रावतीचे अध्यक्ष संतोष रामटेके, महिला आघाडी अध्यक्षा इंदू बोरकर, कार्याध्यक्ष छाया कांबळे, कपील खंडारे, भजनदास आलेवार, आकाश सहारे, बालाजी उरकुडे, वासंती गोवर्धन, सिद्धार्थ खोब्रागडे, वर्षा खोब्रागडे उपस्थित होते. यावेळी आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)