कोरोनाबाबत बिनधास्त राहणे धोकादायकच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:20 IST2021-07-18T04:20:47+5:302021-07-18T04:20:47+5:30
आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या १३ रुग्णांमध्ये चंद्र्पूर मनपा क्षेत्रातील ९, चंद्रपूर तालुका १, भद्रावती १ व ...

कोरोनाबाबत बिनधास्त राहणे धोकादायकच!
आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या १३ रुग्णांमध्ये चंद्र्पूर मनपा क्षेत्रातील ९, चंद्रपूर तालुका १, भद्रावती १ व पोंभूर्णा तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाह, मूल, सावली, गोंडपिपरी, राजुरा, चिमूर, वरोरा, कोरपना, बल्लारपूर व जिवती तालुक्यात एकही रुग्ण आढळला नाही. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ८४ हजार ९१२ वर पोहोचली आहे. आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ८३ हजार २४६ झाली आहे. सध्या १३३ बाधितांवर उपचार सुरू आहेत. ५ लाख ९२ हजार ३५७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ५ लाख ४ हजार ६१ नमुने निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत १५३३ बाधितांचे मृत्यू झाले आहेत. नागरिकांनी नियमित मास्कचा वापर करावा, वारंवार हात धुवावे, सुरक्षित अंतर ठेवावे आणि कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतरही खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.