इटलीच्या रुग्णांना ‘काळें’ची भुरळ

By Admin | Updated: February 1, 2015 22:52 IST2015-02-01T22:52:51+5:302015-02-01T22:52:51+5:30

प्रजासत्ताक दिनी बिबी ग्रामसभेने डॉक्टर ही पदवी बहाल केलेले समाजसेवक डॉ. गिरीधर काळे यांच्या कार्याची भुरळ इटलीच्या नागरिकांनाही आता पडली आहे. बल्लारशाह येथे इटली येथील

Italian colleagues 'chains of love' | इटलीच्या रुग्णांना ‘काळें’ची भुरळ

इटलीच्या रुग्णांना ‘काळें’ची भुरळ

रत्नाकर चटप - नांदाफाटा
प्रजासत्ताक दिनी बिबी ग्रामसभेने डॉक्टर ही पदवी बहाल केलेले समाजसेवक डॉ. गिरीधर काळे यांच्या कार्याची भुरळ इटलीच्या नागरिकांनाही आता पडली आहे. बल्लारशाह येथे इटली येथील रुग्ण आलिया गुप्ता व खुशविंदर गुप्ता हे आले असताना, त्यांना काळे यांच्या उपचाराची माहिती वर्तमानपत्रातून कळली आणि त्यांनी बिबी येथे जाऊन काळे यांच्याकडून उपचार घेतला.
गेल्या अनेक वर्षापासून गुप्ता कुटुंबीयांना कंबरेचा त्रास आहे. विदेशातील अनेक नामवंत डॉक्टरांकडून त्यांनी उपचार घेतला. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. गिरीधर काळे यांनी आपल्या अनुभव व कौशल्याने त्यांच्यावर उपचार केला आणि विना पदवीच्या या डॉक्टरांच्या उपचाराने त्यांच्यावर भुरळ पडली. त्यांचे अनेक वर्षापासूनचे दु:खने आता काही प्रमाणात आराम असल्याचे इटलीच्या रुग्णांनी सांगत समाधान व्यक्त केला आहे.
गेल्या २५ वर्षापासून गिरीधर काळे मोडलेल्या हाडांचा, लचकलेल्या अस्थिरुग्णांवर नि:शुल्क उपचार करीत आहेत. शहरातील नामांकित डॉक्टरांनीही त्यांच्या कामाची वावा केली आहे. आजतागायत चार लाखाहून अधिक रुग्णांवर त्यांनी उपचार केलेला असून परराज्यातील रुग्णांचा ओढा त्यांच्याकडे सतत वाढत आहे. याचा परिणाम त्यांनी उपचारपद्धती आता विदेशी पर्यटक व नागरिकांनाही भुरळ घालत आहे.
बिबी येथे दररोज १०० हून अधिक रुग्ण काळे यांचेकडे उपचारासाठी येतात. यामध्ये शुक्रवार आणि रविवार या दिवशी रुग्णांची संख्या अधिक असते.
शेती हा मूळ व्यवसाय करणाऱ्या काळे यांना समाजसेवेचे हे व्रत पेलताना दिवसरात्र मेहनत करावी लागत आहे. काळे यांच्या कार्याची ओळख सर्वांना व्हावी म्हणून येथील कवी अविनाश पोईनकर यांचे ‘हाडाचा माणूस’ हे चरित्रग्रंथ लवकरच वाचकांच्या समोर येणार आहे.

Web Title: Italian colleagues 'chains of love'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.