लोकमत सखी मंचतर्फे घडणार

By Admin | Updated: December 18, 2015 01:22 IST2015-12-18T01:20:10+5:302015-12-18T01:22:32+5:30

महिलांमधील सुप्तगुणांना वाव मिळवून देणाऱ्या लोकमत सखीमंचतर्फे शनिवारी महिलांसाठी एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

It will happen through the Lokmat Sakhi platform | लोकमत सखी मंचतर्फे घडणार

लोकमत सखी मंचतर्फे घडणार

प्रशांत दामले, तेजश्री प्रधानची ग्रेट भेट
१९ ला आयोजन : ‘कार्टी काळजात घुसली’चे दोन प्रयोग
चंद्रपूर : महिलांमधील सुप्तगुणांना वाव मिळवून देणाऱ्या लोकमत सखीमंचतर्फे शनिवारी महिलांसाठी एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ग्रेट भेट’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून नाट्य तथा सिनेअभिनेते प्रशांत दामले व ‘होणार सून मी या घरची’ या मराठी टिव्ही मालिकेतील जान्हवी (तेजश्री प्रधान) यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी सखी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मिळणार आहे.
‘कार्टी काळजात घुसली’ या नाट्य प्रयोगाच्या निमित्ताने अभिनेते प्रशांत दामले, अभिनेत्री तेजश्री प्रधान चंद्रपुरात येत आहेत. या नाटकाला रसिकांचा मिळालेला तुफान प्रतिसाद लक्षात घेता, या नाटकाचे एकाच दिवशी दोन प्रयोग आयोजित करण्यात आले आहेत. पहिला प्रयोग सायंकाळी ५.३० वाजता सुरू होईल, तर दुसरा प्रयोग रात्री ९.३० वाजता सादर होईल.
स्थानिक प्रिदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात शनिवारी सायंकाळी ७ वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र कार्यक्रमाच्या वेळेत थोडा बदल करण्यात आला असून हा कार्यक्रम दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आला असून सखीमंच सदस्य व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याची विनंती सखीमंचतर्फे करण्यात आली आहे. या कार्यक्रमात सखीमंच सदस्यांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. त्यासाठी संबधित सखींनी आपले ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य राहील. इतरांनाही या कार्यक्रमाचा आस्वाद घेता येणार असून त्यासाठी प्रत्येकी ५० रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. इतरांसाठीच्या पासेस १८ डिसेंबरपासून लोकमतच्या जिल्हा कार्यालयातून उपलब्ध करून देण्यात येतील.
अभिनेते प्रशांत दामले व तेजश्री प्रधान यांच्या अभिनायाने नटलेले ‘कार्टी काळजात घुसली’ या नाटकाचा शोच्या सर्व तिकीटांची विक्री झाली असून हाऊसफुल्लचे बोर्ड लागले आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: It will happen through the Lokmat Sakhi platform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.