शेतकरी सुखी असावा, हाच आमचा निर्धार
By Admin | Updated: June 1, 2017 01:33 IST2017-06-01T01:33:15+5:302017-06-01T01:33:15+5:30
जर शेतकरी सुखी असेल, तरच देशाची प्रगती होऊ शकते. त्यामुळे आम्ही नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत.

शेतकरी सुखी असावा, हाच आमचा निर्धार
संजय धोटे : शिवार संवाद यात्रा
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जर शेतकरी सुखी असेल, तरच देशाची प्रगती होऊ शकते. त्यामुळे आम्ही नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. त्यामुळे शेतकरी सुखी असावा, हाच आमच्या पक्षाचा निर्धार असल्याचे प्रतिपादन आ. अॅड संजय धोटे यांनी केले.
सुमठाणा व मानोली येथे बुधवारला शिवार सभा यात्रेमध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी गावकऱ्याची भेट घेऊन चर्चा केली. आमदार अॅड. संजय धोट पुढे म्हणाले, जनतेच्या कल्याणकरिता सरकार अनेक योजना राबवित आहे. जलयुक्त शिवाराचे कामे सुरू आहेत, शेतकरी व गावातील विकास कामाकरिता केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना सरकार राबवित आहे येणाऱ्या काळात आमचा एकच निर्धार असून, शेतकऱ्यानी सरकारच्या योजनेचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन शिवार सभा यात्रा प्रसंगी आमदार अँड संजय धोटे यांनी केले. यावेळी जि. प. सदस्य सुनील उरकुडे, सुमठाणा येथील सरपंच मंदा बोबडे, उपसरपंच सुधाकर ताकसांडे, शरद नगराळे, उपसरपंच मानोली पेटकर आदी उपस्थित होते. यावेळी आमदार अॅड. संजय धोटे यांनी शेतकची भेट घेऊन ऱ्यांच्याशी चर्चा केली. यावेळी अडीच वर्षाच्या काळात सरकारने राबविलेल्या योजनेच्या पुस्तकाचे वाटप करण्यात आले.