डॉक्टरांच्या ऋणातून मुक्त होणे अशक्यप्राय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:19 IST2021-07-08T04:19:05+5:302021-07-08T04:19:05+5:30
वरोरा : संपूर्ण विश्व कोरोनासारख्या महामारीशी झुंज देत आहे. या काळात डॉक्टर समाज आणि देशाच्या सेवेसाठी आपल्या जिवाची पर्वा ...

डॉक्टरांच्या ऋणातून मुक्त होणे अशक्यप्राय
वरोरा : संपूर्ण विश्व कोरोनासारख्या महामारीशी झुंज देत आहे. या काळात डॉक्टर समाज आणि देशाच्या सेवेसाठी आपल्या जिवाची पर्वा न करता दिवसरात्र अविरतपणे कार्यरत आहेत. वर्षानुवर्षे देवदूताच्या भूमिकेतून जनतेची सेवा बजावणाऱ्या डॉक्टरांच्या ऋणातून कोणीही मुक्त होऊ शकत नाही, असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ वरोऱ्याचे अध्यक्ष हिरालाल बघेले यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ वरोरा रोटरी डिस्ट्रिक ३०३० चे २०२१-२२ ची नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली. नवीन कार्यकारिणीतर्फे उपजिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त कोविड-१९ च्या जागतिक महामारीच्या प्रतिकूल परिस्थितीत वरोरा शहरातील नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करणाऱ्या शहरातील जिगरबाज डॉक्टर्सना कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी वरोरा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंकुश राठोड होते. व्यासपीठावर डॉ. सागर वझे, डॉ. विनोद तेला, रोटरी क्लब ऑफ वरोरा सचिव बंडू देऊळकर डॉ. निखिल लांबट प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंकुश राठोड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळू मंजूळकर, डॉ. रमेश जाजू, डाॅ. निशी सैनानी, डॉ. प्रदीप पराते, डॉ. विजय चांडक, डॉ. संतोष मुळेवार, डॉ. हेमंत खापणे, डॉ. सागर वझे, डॉ. विवेक तेला, डॉ. मीना पराते, डॉ. शोभा चांडक, डॉ. हेमलता खापने, डॉ. राजेंद्र ढवस, डॉ. राहुल धांडे, डॉ. विशाल हिवरकर, डॉ. अमोल हजारे, डॉ. जगदीश वैद्य, डॉ. मेहरदीप हटवार, डॉ. प्रवीण विश्वंभर, डॉ. शेख, डॉ. आशिष चवले आदींना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन जीवतोडे यांनी केले. सूत्रसंचालन पराग पत्तीवार यांनी केले. आभार नितेश जयस्वाल यांनी मानले.
कार्यक्रमासाठी समीर बारई, होजैफ अली, जितेंद्र मत्ते, विनोद नंदूरकर, अमित नाहर, अमित लाहोटी, राम लोया, विजय पावडे, धनंजय पिसाळ, योगेश डोंगरवार, आशिष ठाकरे, पवन बुजाडे, विशाल जाजू, दामोदर भासपाले, आयचित, अमोल मुथा,विनोद जानवे आदींनी सहकार्य केले.
070721\img-20210702-wa0121.jpg
image