दगडाच्या खदानीत पडल्याने इसमाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:21 IST2020-12-27T04:21:22+5:302020-12-27T04:21:22+5:30
वरोरा तालुक्यातील मठाला गावाच्या परिसरात अनेक दगडाच्या खाणी आहेत. परिसरातील मंदिर व टेकड्यांचे महत्त्व अबाधित राहावे, याकरिता सदर परिसरात ...

दगडाच्या खदानीत पडल्याने इसमाचा मृत्यू
वरोरा तालुक्यातील मठाला गावाच्या परिसरात अनेक दगडाच्या खाणी आहेत. परिसरातील मंदिर व टेकड्यांचे महत्त्व अबाधित राहावे, याकरिता सदर परिसरात उत्खनन करण्यास पुरातन विभागाने बंदी घातली आहे. प्रशासनाची नजर चुकवून दगड काढण्याचे काम सुरू असल्याचे समजते. अघन रामचरण कोसले (५५) हा सकाळी शौचालयासाठी गेला असता खदानीत पडून त्याचा मृत्यू झाला. शेगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठीकरिता उपजिल्हा रुग्णालयात पाठविला.
बॉक्स
तीन वाहनाने मृतदेहाचा प्रवास
अपघात झाल्यानंतर मृतदेह एका वाहनात ठेवून शवविच्छेदनासाठी नेत असताना काही अंतर पार केल्यानंतर वाहनातील डिझेल संपले. नंतर दुसरे वाहन बोलविण्यात आले. त्या वाहनाने काही अंतर पार केल्यानंतर ते नादुरुस्त झाले. नंतर तिसरे वाहन बोलावून मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात पोचवण्यात आला. पंधरा किमीचे अंतर गाठण्यासाठी सहा तास लागले.