लोकमत न्यूज नेटवर्कतोहोगाव (चंद्रपूर): गोंडपिपरी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची अत्यंत धक्कादायक घटना बुधवारी (दि. ८ एप्रिल) उघडकीस आली आहे. या प्रकरणात पीडितेचे वडील (३७) आरोपी असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी इयत्ता नववीत शिक्षण घेत आहे. कुटुंबात वडिलांना दारूचे व्यसन असल्याने वारंवार वाद होत होते. त्यामुळे तीन महिन्यांपूर्वी मुलीची आई दोन्ही मुलांना घेऊन राजुरा येथे माहेरी गेली होती. मात्र, परीक्षेमुळे वडिलांनी मुलीला पुन्हा गावाला आणले. दरम्यान, आरोपीने मुलीवर पुन्हा अत्याचार केल्याचा आरोप आहे.
दुसऱ्या दिवशी शाळेत परीक्षा देण्यासाठी आलेल्या मुलीच्या बॅगेत कपडे आढळल्याने शिक्षकांना संशय आला. चौकशीदरम्यान मुलगी भावनिक झाली. तिने घडलेला प्रकार सांगितला. शिक्षकांनी गावातील पोलिस पाटील यांना माहिती देत लाठी पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. पोलिसांनी शाळेत पोहोचून मुलीची चौकशी केली. तिच्या जबाबानुसार तातडीने गुन्हा नोंदवून पुढील कारवाई करण्यात आली. पीडितेची वैद्यकीय तपासणी चंद्रपूर येथे करण्यात आली. अहवालानंतर पोलिसांनी आरोपीला त्याच्या राहत्या घरातून अटक केली असून सध्या तो पोलिस कोठडीत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
शिक्षकांच्या सतर्कतेने घटना उघड
या प्रकरणाचा भंडाफोड करण्यात शाळेतील शिक्षकांची भूमिका महत्त्वाची ठरली. त्यांच्या सतर्कतेमुळेच हा प्रकार उघडकीस आला असून त्यांनी सामाजिक जबाबदारीचे भान राखत संवेदनशीलतेचे उदाहरण घालून दिले आहे.
Web Summary : A shocking incident in Gondpipari: A father, 37, has been arrested for repeatedly abusing his minor daughter, a ninth-grade student. Alert teachers uncovered the crime when they found clothes in her bag. Police are investigating.
Web Summary : गोंडपिपरी में घिनौनी घटना: एक 37 वर्षीय पिता को अपनी नाबालिग बेटी के साथ बार-बार दुष्कर्म करने के आरोप में गिरफ्तार किया गया है। नौवीं कक्षा की छात्रा की बैग में कपड़े मिलने पर सतर्क शिक्षकों ने अपराध उजागर किया। पुलिस जांच कर रही है।