शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन प्रकल्प ६० टक्के भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 05:00 IST

मागील वर्षीचा हंगाम शेतकऱ्यांसाठी अभिशाप ठरला. मोठ्या उत्साहाने पैशाची जुळवाजुळव करुन शेतकरी गतवर्षी खरीपासाठी उभा झाला. मात्र वरूणराजाने त्याचे कंबरडेच मोडले. यावर्षीही पावसाने प्रारंभी शेतकऱ्यांना दगा दिला. जून महिन्यात पावसाचे आगमन झाले. मात्र लवकरच तो गायब झाला. परिणामी शेतकऱ्यांना पिके वाचविताना मोठी कसरत करावी लागली होती. कशीबशी शेतकऱ्यांनी आपली पिके वाचविली.

ठळक मुद्देइरईत ५९ टक्के पाणीसाठा : मागील वर्षीच्या तुलनेत जुलै महिन्यात दुप्पट जलसाठा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जुलै महिन्यात सातत्याने पाऊस येत असल्याने जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात बऱ्यापैकी पाणी जमा होत आहे. जुलै महिना संपण्यापूर्वी जिल्ह्यातील दहा मोठ्या जलाशयात एकूण सरासरी ६०.४८ टक्के पाण्याची साठवणूक झाली आहे. डोंगरगाव प्रकल्प तर आताच ओव्हरफ्लो झाला आहे तर आसोलामेंढा ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे.मागील वर्षीचा हंगाम शेतकऱ्यांसाठी अभिशाप ठरला. मोठ्या उत्साहाने पैशाची जुळवाजुळव करुन शेतकरी गतवर्षी खरीपासाठी उभा झाला. मात्र वरूणराजाने त्याचे कंबरडेच मोडले. यावर्षीही पावसाने प्रारंभी शेतकऱ्यांना दगा दिला. जून महिन्यात पावसाचे आगमन झाले. मात्र लवकरच तो गायब झाला. परिणामी शेतकऱ्यांना पिके वाचविताना मोठी कसरत करावी लागली होती. कशीबशी शेतकऱ्यांनी आपली पिके वाचविली. अनेक शेतकऱ्यांकडे सिंचनाचा अभाव आहे. ग्रामीण भागात पसरलेले मामा तलावांचे जाळे शेतकऱ्यांसाठी वरदान आहेत. जुलै महिन्यात पावसाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. या महिन्यात बऱ्यापैकी पाऊस पडत आहे. जुलैच्या पंधरवाड्यानंतर दररोज पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे नदी, नाले, बोड्या, तलाव यामध्ये पाण्याची साठवणूक होऊ लागली आहे. जिल्ह्यात दहा मोठे सिंचन प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये सरासरी बघितले तर ६०.४८ टक्के जलसाठा झाला आहे. या सिंचन प्रकल्पांवर खरीप आणि रबी दोन्ही हंगामाची धुरा असते. आता जुलै महिन्याच्या २३ तारखेपर्यंतच या प्रकल्पांमध्ये बऱ्यापैकी पाणी असल्याने शेतकरी आनंदले आहे.डोंगरगाव प्रकल्प ओव्हरफ्लोजिल्ह्यातील दहा प्रकल्पांपैकी डोंगरगाव सिंचन प्रकल्प आताच ओव्हरफ्लो झाला आहे. तर असालामेंढा प्रकल्प ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. या प्रकल्पात सध्या ९२.७२ टक्के जलसाठा आहे. येत्या काही दिवसात आसोलामेंढा प्रकल्पदेखील ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :DamधरणRainपाऊस