मामा तलावाच्या बांधकामात अनियमितता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 11:05 PM2018-03-03T23:05:25+5:302018-03-03T23:05:25+5:30

सिंदेवाही तालुक्यातील वासेरा येथील पाटबंधारे विभागामार्फत मामा तलावाचे बांधकाम चार महिन्यांपासून सुरू आहे.

Irregularities in the construction of Mama Lake | मामा तलावाच्या बांधकामात अनियमितता

मामा तलावाच्या बांधकामात अनियमितता

Next
ठळक मुद्देविभागाचे दुर्लक्ष : बांधकामाची चौकशी करण्याची नागरिकांची मागणी

आॅनलाईन लोकमत
वासेरा : सिंदेवाही तालुक्यातील वासेरा येथील पाटबंधारे विभागामार्फत मामा तलावाचे बांधकाम चार महिन्यांपासून सुरू आहे. मात्र, कालव्याचे खोलीकरण, तलाव पाळ दुरूस्ती आणि अन्य कामांमध्ये अनियमिता असून चौकशी करावी, अशी मागणी केली जात आहे.
कालव्याचे काम सुरू असताना संबंधित पाटबंधारे विभागाचे अभियंता स्वत: हजर राहून वितरिकेचे मोजमाप करून देणे आवश्यकता असताना याकडे दुर्लक्ष होत आहे. त्याचा परिणाम सर्वच कामावर दिसत आहे. मामा तलाव कमिटी अस्तित्वात आहे. ही बाब सदर कमिटीच्या लक्षात येताच पाटबंधारे विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली. सदर कामात लहान पाईपचा वापर केला जात आहे. त्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात शेतात जाणार नाही. तक्रार केल्यानंतर पाटबंधारे विभागाचे अभियंता सोनेकर यांनी पाहणी केली. ही कामे चुकीच्या पद्धतीने झाल्याची माहिती शेतकºयांनी दिली. काही शेतकºयांनी ही कामे बंद करून नवीन बांधण्याचे अधिकाºयांना सांगितले.
परंतु, अधिकाºयांनी टाळाटाळ केली, असा आरोप होत आहे. भडगर, मापनर, राजोली मापनर येथील मोरी बांधकामही नियमाला धरून नाही. खोलीकरण कामात चुका असल्याचे कमिटीने दाखवून दिल्यानंतर पुन्हा खोलीकरण करण्यात आले.
सदर कामावर मुरूमाचे काम करण्यात आले. पण, कंत्राटदाराने मुरुमाची परवानगी न घेता वापर केल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. या बांधकामात १०० ब्रॉस मुरुमाचा वापर झाला, असा अंदाज आहे. बांधकाम करण्यासाठी शासनाने नियम ठरवून दिले आहेत. त्यामुळे संबंधित अधिकारी व कंत्राटदारांनी नियमांचे पालन केले पाहिजे.
शिवाय, वरिष्ठ अधिकाºयांनी देखील कामांचे वारंवार मूल्यांकन करणे गरजेचे आहे. पण, वासेरा येथील बांधकामाकडे महसूल विभागाचे लक्ष नाही. कोणतेही शासकीय काम करीत असताना मुरुमाची परवानगी संबंधित विभागाकडून घेणे बंधनकारक आहे परंतु, नियमांची सर्रास पायमल्ली सुरू असल्याचे दिसून येत आहे. या बांधकामाची चौकशी करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

Web Title: Irregularities in the construction of Mama Lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.