विभागीय समितीकडून जुगनाळा ग्रा.पं.ची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 06:00 AM2019-12-06T06:00:00+5:302019-12-06T06:00:55+5:30

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत सन २०१८-१९ या वर्षात जुगनाळा प्रथम तर आष्टा ग्रामपंचायतने द्वितीय पुरस्कार पटकावला होता. त्यामुळे विभागीय तपासणी समितीने या गावाला नुकतीच भेट देऊन पाहणी केली. तपासणी समितीचे अध्यक्ष तथा उपायुक्त (आस्थापना) अंकुश केदार, उपायुक्त (विकास) सुनिल निकम सहाय्यक संचालक प्रभाकर बाराहाते, उपअभियंता मनोज केंदळे, जलस्वराज्यचे अरूण पोहाणे, विस्तार अधिकारी छत्रपाल पटले यांचा समितीत समावेश आहे.

Investigation of Jugnala GRP by Divisional Committee | विभागीय समितीकडून जुगनाळा ग्रा.पं.ची तपासणी

विभागीय समितीकडून जुगनाळा ग्रा.पं.ची तपासणी

Next
ठळक मुद्देनिकालाची उत्सुकता : सहा जिल्ह्यांतील १२ ग्रामपंचायतींची स्वच्छता स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत सन २०१८-१९ या वर्षात जुगनाळा प्रथम तर आष्टा ग्रामपंचायतने द्वितीय पुरस्कार पटकावला होता. त्यामुळे विभागीय तपासणी समितीने या गावाला नुकतीच भेट देऊन पाहणी केली.
तपासणी समितीचे अध्यक्ष तथा उपायुक्त (आस्थापना) अंकुश केदार, उपायुक्त (विकास) सुनिल निकम सहाय्यक संचालक प्रभाकर बाराहाते, उपअभियंता मनोज केंदळे, जलस्वराज्यचे अरूण पोहाणे, विस्तार अधिकारी छत्रपाल पटले यांचा समितीत समावेश आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय पचारे, गट विकास अधिकारी प्रदिप बिरमवार, सहाय्यक गट विकास अधिकारी प्राजक्ता भस्मे, जिल्हा पाणी व स्वच्छता कक्षाचे बंडू हिरवे, साजिद निजामी, धोटे, विस्तार अधिकारी पंचायत विभाग जे.के.राऊत आर.जे. घुबडे, जे. जी.बोरकर, के. डी. खोब्रागडे, विस्तार अधिकारी धनविजय पाणी पुरवठा अभियंता बारसागडे मेश्राम उपस्थित होते. गावातील विविध उपक्रमांबाबत समितीने ग्रामस्थांशी चर्चा केली.

‘मायेची सावली’सुरू
विभागीय स्पर्धेत सहा जिल्ह्यातील १२ ग्रामपंचायतींमध्ये स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेकरिता ग्रामपंचायत व नागरिकांकडून कसून प्रयत्न केल्या जात आहे. दरम्यान जुगनाळा येथे टाटा ट्रस्टद्वारे सुरू केलेल्या ‘मायेची सावली’ कक्षाचे उद्घाटन पार पडले. यावेळी सरपंच गोपाल ठाकरे, उपसरपंच प्रमोद धोटे, सचिव शमा नानोरीकर, सदस्य अंगणवाडी सेविका, आरोग्यसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Investigation of Jugnala GRP by Divisional Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.