‘त्या’ तांदूळ अफरातफरीची चौकशी थंडबस्त्यात
By Admin | Updated: February 26, 2015 00:37 IST2015-02-26T00:37:54+5:302015-02-26T00:37:54+5:30
गरिबांना सवलतीच्या दरात अन्न मिळावे म्हणून शासन स्तरावर अनेक योजनांची अंमलबजावणी केली जात असते. पण ती काटेकोरपणे राबविली जात नाही.

‘त्या’ तांदूळ अफरातफरीची चौकशी थंडबस्त्यात
ब्रह्मपुरी: गरिबांना सवलतीच्या दरात अन्न मिळावे म्हणून शासन स्तरावर अनेक योजनांची अंमलबजावणी केली जात असते. पण ती काटेकोरपणे राबविली जात नाही. एक वर्षापूर्वी एक ट्रक तांदूळ ब्रह्मपुरीच्या गोडावूनमधून परस्पर विकल्याची घटना घडली होती. त्याची परस्पर पोलीस नोंद करण्यात आली होती. त्यानंतर ही चौकशी थंडबस्त्यात असल्याने चिमूरच्या धर्तीवर ब्रह्मपुरीतही चौकशी करावी व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
एक वर्षापूर्वी ब्रह्मपुरीच्या शासकीय गोदामात एक ट्रक तांदूळ मागितल्यानंतर शासनाने तो तांदूळ पाठविला. परंतु लगेच गोडावूनला पोहचण्यापूर्वीच तो परस्पर विकण्यात आला.यावेळी रंगेहातच ट्रक पकडण्यात आला होता. लगेच त्या घटनेची नोंद पोलीस दप्तरी करण्यात आली होती. तत्कालीन पुरवठा अधिकाऱ्यांना आरोपी बनविण्यात आले होते. मात्र याची चौकशी आता थंडबस्त्यात आहे. (तालुुका प्रतिनिधी)