इंटरनेट सेवा विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:14 IST2021-01-13T05:14:16+5:302021-01-13T05:14:16+5:30
झुडपांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले भद्रावती : जिल्ह्यातील अनेक वळण मार्गावर झुडपे वाढली आहेत. त्यामुळे समोरून येणारे वाहन दिसत नाही. ...

इंटरनेट सेवा विस्कळीत
झुडपांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले
भद्रावती : जिल्ह्यातील अनेक वळण मार्गावर झुडपे वाढली आहेत. त्यामुळे समोरून येणारे वाहन दिसत नाही. अनेकदा येथे अपघातही घडले आहेत. त्यामुळे अनेकांचे जीव गेले, तर बहुतेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्त्यावरील झुडपे तोडण्याची मागणी होत आहे.
प्लॅस्टिकवर बंदी केवळ नावापुरती
चंद्रपूर : शहरात दिवसेंदिवस प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर वाढत आहे. शहरातील गंजवॉर्ड, गोलबाजार, भिवापूर सुपर मार्केट व अन्य बाजाराच्या ठिकाणी गरज नसताानाही प्लॅस्टिक पिशव्या देण्यात येतात. या पिशव्या कुठेही टाकून देण्यात येत असल्याने पर्यावरणास धोका आहे.
सास्तीत धुळीचे साम्राज्य
सास्ती : राजुरा-सास्ती गडचांदूर टी पॉइंटवर नागरिकांना कोळशाच्या धुळीचा सामना करावा लागत आहे. या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर कोळशाची वाहतूक सुरू आहे. ताडपत्री झाकून कोळशाची वाहतूक करण्याचा नियम असताना या नियमाला वाहतूकदारांकडून बगल दिली जात आहे.
कुत्र्यांच्या हैदोसाने नागरिक त्रस्त
चिमूर : शहरात रात्रीच्या वेळी मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढला आहे. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीने जात असताना ही मोकाट कुत्री अचानक गाडीवर झेप घेतात. यामुळे अपघातही वाढले आहेत. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.