शिक्षण क्षेत्रातील समस्या सोडविण्यात विमाशि कटिबद्ध

By Admin | Updated: November 13, 2015 01:09 IST2015-11-13T01:09:13+5:302015-11-13T01:09:13+5:30

महाराष्ट्र शिक्षण क्षेत्रात विविध ज्वलंत समस्या निर्माण झाल्या असून त्या सोडविण्यासाठी सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी यांनी ....

Insurance policies to solve the problems of education sector | शिक्षण क्षेत्रातील समस्या सोडविण्यात विमाशि कटिबद्ध

शिक्षण क्षेत्रातील समस्या सोडविण्यात विमाशि कटिबद्ध

सुधाकर अडबाले : गडचांदूर येथे सत्कार
गडचांदूर : महाराष्ट्र शिक्षण क्षेत्रात विविध ज्वलंत समस्या निर्माण झाल्या असून त्या सोडविण्यासाठी सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी यांनी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेच्या मागे राहण्याचे आवाहन विमाशीचे नवनिर्वाचीत सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांनी स्थानिक महात्मा गांधी विद्यालयाच्या सभागृहात आयोजित सत्कार समारंभात केले.
कोरपना- जिवती तालुका विमाशीच्या वतीने सोमवारी सुधाकर अडबाले यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळचे सचिव प्रा. डॉ. अनिल चिताडे होते, प्रमुख पाहुणे म्हणून विठ्ठल थिपे, प्राचार्य सुभाष पाथ्रीकर, धनंजय गोरे, विमाशीचे जिल्हा कार्यवाह शेंडे, ठाकरे, कोडलकर, नभिलास भगत, बावणे, धोपटे सोनकुसरे, तुळशिराम पुंजेकर, गोखरे, पर्यवेक्षक गिरीधर बोबडे, उद्धव निखाडे, मुख्याध्यापक अशोक डोहे तथा इतर पाहुणे उपस्थित होते.
नवनिर्वाचीत सहकार्यवाह सुधाकर अडबाले यांचा सत्कार डॉ. अनिल चिताडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन करण्यात आला. सुधाकर अडबाले यांनी सत्काराला उत्तर देताना शिक्षण क्षेत्रातील सुरु असलेला सवळागोंधळ सांगितला. दररोज नवनवीन अध्यादेश काढून शिक्षकांना वेठीस धरण्याचे कार्य शासन करीत असल्याचा आरोप करुन या विरोधात शिक्षकांना न्याय देण्यासाठी विमाशी कटीबद्ध असल्याचे सांगितले. विमाशीने अनेक शिक्षकांना न्याय मिळवून दिल्याचे सांगून विमाशीला मजबूत करण्यासाठी पूर्व वेळ देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
डॉ. अनिल चिताडे यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थी केंद्रीत शिक्षण धोरण शासनाने तयार करावे. शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नये, असे सांगितले. यावेळी विठ्ठल थिपे यांनी विमाशीच्या कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोडलवार यांनी केले. संचालन विमाशीचे जिवती तालुका अध्यक्ष पाचभाई यांनी केले. आभार कृष्णा बत्तुलवार यांना मानले. कार्यक्रमाला कोरपना जिवती तालुक्यातील मुख्याध्यापक शिक्षक, प्राध्यापक उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Insurance policies to solve the problems of education sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.