डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फवारणी करण्याचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:18 IST2021-07-22T04:18:16+5:302021-07-22T04:18:16+5:30
मागील वर्षीपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. जीवन विस्कळीत झाले होते. आता काही प्रमाणात का होईना कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत ...

डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फवारणी करण्याचे निर्देश
मागील वर्षीपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. जीवन विस्कळीत झाले होते. आता काही प्रमाणात का होईना कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे, परंतु चिमूर तालुक्यात डेंग्यूचे रुग्ण अतिशय मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. डेंग्यूमुळे बालकांपासून वृद्धांपर्यंत याचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्यामुळे आरोग्य विभागावर अतिशय मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. हा ताण कमी करण्यासाठी व डेंग्यूचे रुग्ण वाढू नये म्हणून ग्रामपंचायतीमार्फत प्रत्येक गावात धूरळणी व फवारणी करण्याचे निर्देश उपसभापती ढोक दिलेले आहे. ही फवारणी आठवड्यातून एकदा करण्यात यावी. त्याचा पाठपुरावा पंचायत समितीने तत्काळ घ्यावा. ज्या ग्रामपंचायतीमार्फत फवारणी व धूरळणी करण्यात आलेले नाही, अशा ग्रामसेवकावर तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश या मासिक सभेत देण्यात आलेले आहे.