घुग्घुसमधील प्रमुख रस्त्यावर पथदिवे लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:32 IST2021-09-04T04:32:42+5:302021-09-04T04:32:42+5:30

घुग्घुस : गेल्या २७ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधी व संघर्षानंतर घुग्घुस गावाला नगरपरिषदेचा दर्जा मिळाला असून, आता शहराच्या सौंदर्यीकरणाच्या ...

Install streetlights on the main road in Ghughhus | घुग्घुसमधील प्रमुख रस्त्यावर पथदिवे लावा

घुग्घुसमधील प्रमुख रस्त्यावर पथदिवे लावा

घुग्घुस : गेल्या २७ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधी व संघर्षानंतर घुग्घुस गावाला नगरपरिषदेचा दर्जा मिळाला असून, आता शहराच्या सौंदर्यीकरणाच्या दृष्टीने पथदिवे लावण्याची मागणी शहर अध्यक्ष राजू रेड्डी यांनी नगरपरिषदच्या मुख्याधिकारी आर्शिया जुही यांना निवेदन देऊन केली.

शहरातील बायपास रोड ते टेम्पो क्लब, बंगाली कॅम्प, तिलकनगर, बहादे-ले-आउट, ते बौद्ध स्मशान भूमी व बौद्ध स्मशान भूमी ते पंचशील चौक, मिरची मार्केट ते पंचशील चौक, पंचशील चौक ते पोळा मैदान, गांधी चौक ते बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया ते पोलीस स्टेशन व अन्य प्रमुख मार्गावर पथदिवे लावण्यासाठी काँग्रेस शिष्टमंडळाने हे निवेदन दिले आहे. शिष्टमंडळात घुग्घुस काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी, किसान जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, कामगार नेते सैय्यद अनवर, प्रफुल्ल हिकरे, नुरुल सिद्दिकी, रोशन दंतलवार, इर्शाद कुरेशी, शुभम घोडके व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Install streetlights on the main road in Ghughhus