दीक्षाभूमीत बुद्धरुप प्रतिष्ठापना
By Admin | Updated: May 15, 2014 01:03 IST2014-05-15T01:03:49+5:302014-05-15T01:03:49+5:30
बुद्ध जयंतीच्या पर्वावर त्रिविध वैशाख पोर्णिमेचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटी चंद्रपूरद्वारा दीक्षाभूमी चंद्रपूर येथे पूर्णत्वास येत असलेल्या बुद्धविहारात ..

दीक्षाभूमीत बुद्धरुप प्रतिष्ठापना
चंद्रपूर : बुद्ध जयंतीच्या पर्वावर त्रिविध वैशाख पोर्णिमेचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटी चंद्रपूरद्वारा दीक्षाभूमी चंद्रपूर येथे पूर्णत्वास येत असलेल्या बुद्धविहारात बुद्धरुपाची प्रतिष्ठापरना देश-विदेशातील भिक्खू संघ व श्राममेर संघाच्या उपस्थितीत मोठय़ा उत्साहाने करण्यात आली. याप्रसंगी भदंत उर्डार्नकनार्क, थायलँड येथील भदंत सुरई ससाई, नागपूर येथील विनय बोधिप्रिय यांची उपस्थिती होती.
अभय मुद्रेत असलेले बुद्धरुप हे अतिशय आकर्षक तथा भव्य असून उंची १६.५ फुट व वजन ३ टन आहे. चालत्या अवस्थेत असलेल्या हे बुद्धरुरप बुध्द धम्माच्या प्रसार आणि प्रचाराचे प्रतिक आहे. हे बुद्धरुप थायलँड येथे घडविण्यात आले असून सोमलक व त्यांची पत्नी कुनलया यांच्या सौजन्याने दिक्षाभूमीला प्राप्त झाली आहे. सोमलक कुटुंबीयांनी दिक्षाभूमी येथे त्यांच्या द्वारे प्राप्त करून देण्यात आलेल्या बुद्धरुपाची प्रतिष्ठापना झाल्याबद्दल चंद्रपूर येथील नागरिकांनी आभार मानले आहे. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर, उपाध्यक्ष मारोतराव खोब्रागडे, उपाध्यक्ष अशोक घोटेकर, वामनराव मोडक, सहसचिव कुणाल घोटेकर, व्यवस्थापक धर्मपाल घोटेकर, प्राचार्य डॉ. राजेश दहेगावकर, रुपाताई घोटेकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन थायलँड येथील भिख्यू संघ आणि मूर्तीदायक उपासक व उपासिकांची कृतज्ञता व्यक्त केली आहे. कार्यक्रमाला चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील मोठय़ा संख्येने बौद्ध बांधव उपस्थित होते.
(नगर प्रतिनिधी)