बाबासाहेब स्त्रियांचे प्रेरणास्रोत
By Admin | Updated: April 3, 2016 03:50 IST2016-04-03T03:50:17+5:302016-04-03T03:50:17+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्त्रियांचे प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांनी संविधानामध्ये पुरुषांच्या बरोबरीने हक्क बहाल करुन त्यांना कायदेशीररित्या समानतेचे अधिकार दिले आहेत, ..

बाबासाहेब स्त्रियांचे प्रेरणास्रोत
पंडित फुलझेले : सामाजिक न्याय विभाागातर्फे कार्यक्रम
सावली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्त्रियांचे प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांनी संविधानामध्ये पुरुषांच्या बरोबरीने हक्क बहाल करुन त्यांना कायदेशीररित्या समानतेचे अधिकार दिले आहेत, असे प्रतिपादन प्रा. डॉ. पंडित फुलझेले यांनी केले. ते सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग चंद्रपूरच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा १२५ वा जयंती महोत्सव शासन मोठ्या प्रमाणात राबवत आहे. त्या अनुषंगाने रमाबाई आंबेकडर विद्यालय सावली व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष डॉ. एन. वाय. गेडाम होते. उद्घाटन सावलीच्या नगराध्यक्ष रजनी भडके यांच्या हस्ते करण्यात आले. तर प्रमुख पाहुणे म्हणून ज.सु. दुधे, राजाबाळ पाटील संगीडवार, अशोक गडकरी, ए.जी. गेडाम, रा.का. गेडाम, डॉ.एच. जे. दुधे, पि.यू. गेडाम, नगरसेवक छत्रपती गेडाम, मुख्याध्यापक यु.एच. भैसारे आदी मंचावर उपस्थित होते.
याप्रसंगी ‘भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार राष्ट्रीय एकात्मतेचे, समता व सामाजिक न्यायाचे प्रभावी पाठिराखे’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. सहाय्यक आयुक्त समाजकल्याण विभाग चंद्रपूरच्या वतीने तालुकास्तरीय समाज प्रबोधन, व्याख्याने व उद्बोधनात्मक कार्यक्रमांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे. याप्रसंगी सुभेदार रामजी आंबेडकर बहुउद्देशिय संस्था चंद्रपूरच्या चमुने पथनाट्य सादर केले. प्रास्ताविक सहायक आयुक्त सुनील जाधव यांनी केले. संचालन जे.जे. नगारे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)