पीयुसी केंद्रचालकांची चौकशी सुरु

By Admin | Updated: January 29, 2015 23:03 IST2015-01-29T23:03:21+5:302015-01-29T23:03:21+5:30

वाहनांद्वारे होणारे प्रदूषण रोखण्याची ज्या पीयुसी केंद्राकडे शासनाने जबाबदारी दिली आहे. ते केंद्रचालक कोणतेही वाहन न तपासता ‘कुणीही या अन् पीयूसी घेऊन जा’ अशा पद्तीने आपली

Inquiries of PUC center operators | पीयुसी केंद्रचालकांची चौकशी सुरु

पीयुसी केंद्रचालकांची चौकशी सुरु

आरटीओंचे आदेश : केंद्रसंचालकाला बजावली नोटीस
चंद्रपूर : वाहनांद्वारे होणारे प्रदूषण रोखण्याची ज्या पीयुसी केंद्राकडे शासनाने जबाबदारी दिली आहे. ते केंद्रचालक कोणतेही वाहन न तपासता ‘कुणीही या अन् पीयूसी घेऊन जा’ अशा पद्तीने आपली जबाबदारी पार पाडत आहे. त्यामुळे प्रदूषण कमी होण्याऐवजी वाढत आहे. याचा फटका जिल्ह्यातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन करून येथील प्रकार उघडकीस आणला. यानंतर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांनी केंद्रसंचालकाच्या चौकशीसाठी निरीक्षकांची नियुक्ती केली असून अहवाल मागितला आहे.
औद्योगिक जिल्हा अशी ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये प्रदूषणाचा प्रश्न उभा ठाकला आहे. प्रदूषणामुळे नागरिकांना विविध आजारांना सामना करावा लागत आहे. केंद्रसंचालक मात्र मनमर्जी करीत आहे.

Web Title: Inquiries of PUC center operators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.