शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 11:48 PM

राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त तीन वेळा अकरा महिन्यांच्या नोकरीचे आदेश दिले जाणार असल्याचे परिपत्रक राज्य शासनाने काढले आहे.

ठळक मुद्देबाळू धानोरकर यांना निवेदन : परिपत्रक रद्द करण्याची मागणी

आॅनलाईन लोकमतवरोरा : राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त तीन वेळा अकरा महिन्यांच्या नोकरीचे आदेश दिले जाणार असल्याचे परिपत्रक राज्य शासनाने काढले आहे. या परिपत्रकामुळे शासनाच्या सेवेत कंत्राटी पध्दतीने मागील अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना सेवेपासून मुकावे लागणार आहे. त्यामुळे सदर परिपत्रक रद्द करण्याची मागणी चंद्रपूर जिल्हा कंत्राटी कामगारांच्या शिष्टमंडळाने आमदार बाळू धानोरकर यांच्याकडे निवेदनातून केली आहे.राज्य सरकारने विधी सल्लागार अधिकारी व निर्देशक या पदनामाची ४७१ पदे कंत्राटी स्वरूपात भरण्याची जाहिरात प्रकाशीत केली होती. मात्र ही पदे नियमीत समजण्यात येऊ नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा आधार घेत राज्य सरकारने कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम ठेवण्याचे नविन नियम तयार केले आहेत. विविध विभागात कंत्राटी कर्मचाऱ्यांना भरती करताना अकरा महिन्यांच्या सेवेचे आदेश दिले आहेत. त्यानंतर एक-दोन दिवसाचा खंड देऊन पुन्हा सेवेत सामावून घेतल्याचे आदेश दिले जाते. परंतु, एखादया उमेदवारास तीन वेळा ३३ महिन्यांच्या सेवेचे आदेश दिले, तरी त्यास पुन्हा आदेश देतांना जाहिरात देणे, उमेदवाराने अर्ज करणे, त्यांची मुलाखत घेणे या प्रक्रिया कराव्या लागणार आहेत. या प्रक्रियेमुळे वयोमर्यादा ओलांडलेल्या कार्यरत कर्मचाऱ्यांची कोंडी होण्याची शक्यता असल्याने कंत्राटी कर्मचारी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे शासनाने ९ फेब्रुवारीला काढलेले परिपत्रक रद्द करण्यात यावे, या मागणीचे निवेदन चंद्रपूर जिल्हा कंत्राटी कामगारांच्या शिष्टमंडळाने आ. बाळू धानोरकर यांना दिले. दरम्यान आम. धानोरकर यांनी कंत्राटी कामगारांवर अन्याय करणारे पत्रक रद्द करण्याचा प्रश्न आपण विधानमंडळात लाऊन धरणार असल्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.निवेदन देणाºया शिष्टमंडळात प्रफुल मत्ते, गोविंद कुंभारे, दीपक खडसाने, नेहा इंदूरकर, चंदा बोबडे, सिमान अ‍ॅलक्स, रत्ना ढोले, पंकज साखरकर आदी उपस्थित होते.