नवजात बालकांसाठी पीसीव्ही लसीकरणाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:18 IST2021-07-22T04:18:10+5:302021-07-22T04:18:10+5:30
मूल : येथील उपजिल्हा रुग्णालयात न्यूमोनियावरील पीसीव्ही लसीकरणाला सुरुवात झाली आहे. दीड महिन्यावरील बालकांना ही लस घेता येईल. ...

नवजात बालकांसाठी पीसीव्ही लसीकरणाला सुरुवात
मूल : येथील उपजिल्हा रुग्णालयात न्यूमोनियावरील पीसीव्ही लसीकरणाला सुरुवात झाली आहे. दीड महिन्यावरील बालकांना ही लस घेता येईल. नागरिकांनी आपल्या बाळांना या लसीचे डोस देऊन सुरक्षित करावे, असे आवाहन मूल उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उज्ज्वल इंदूरकर यांनी लसीकरणप्रसंगी मार्गदर्शन करताना केले.
लहान बालकांना श्वसनाचे आजार होऊ नये म्हणून पीसीव्ही देण्यात येणार आहे. दीड महिन्यापासून नवजात बालकांना ही लस दिल्यास त्यांचे न्यूमोनिया या आजारापासून संरक्षण होते. न्यूमोनिया हा श्वसन प्रक्रियेत होणारा आजार आहे. बालक संक्रमित झाल्यास दगावू शकते. बालकांना संरक्षित करण्याच्या दृष्टीने पीसीव्ही ही लस मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमच उपलब्ध झाली असल्याचे डॉ. इंदूरकर यांनी उपस्थित बालकांच्या मातापित्याला मार्गदर्शन करताना सांगितले.