एसएमएस सेवेतून मिळणार पाल्यांच्या शैक्षणिक घडामोडींची माहिती

By Admin | Updated: August 5, 2015 01:09 IST2015-08-05T01:09:15+5:302015-08-05T01:09:15+5:30

येथील लोकमान्य विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामार्फत भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी येथील ग्रामोदय संघाच्या सभागृहात शनिवारी साजरी करण्यात आली.

Information about educational activities of children from SMS service | एसएमएस सेवेतून मिळणार पाल्यांच्या शैक्षणिक घडामोडींची माहिती

एसएमएस सेवेतून मिळणार पाल्यांच्या शैक्षणिक घडामोडींची माहिती

भद्रावतीच्या लोकमान्य टिळक विद्यालयाचा उपक्रम : एसएमएस सेवेचा प्रारंभ
भद्रावती : येथील लोकमान्य विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामार्फत भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी येथील ग्रामोदय संघाच्या सभागृहात शनिवारी साजरी करण्यात आली. यावेळी पाल्यांच्या शैक्षणिक घडामोडींची माहिती पालकांना मिळावी म्हणून एसएमएस सेवेचा शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार होते. प्रमुख अतिथी म्हणून मुरर्ली मनोहर व्यास, विकास उपगन्लावार, मिलींद गंपावार, राजू गैनवार, विठ्ठलराव पारधे, बळवंतराव ताठे, विश्वनाथ पत्तीवार, मधुकरराव नारळे, भास्करराव ताठे, प्राचार्य विनोद पांढरे, उपप्राचार्य रेखा पाबितवार आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते मार्ल्यापण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर मिलिंद गंंपावार, मुरली मनोहर व्यास आणि चंद्रकांत गुंडावार यांनी आपल्या भाषणातून लोकमान्यांना आदरांजली वाहिली.
विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांच्या पालकांना त्यांच्या पाल्यांच्या प्रगतीची व विद्यालयातील शैक्षणिक घडामोडीची माहिती कळावी या हेतुने ‘एम.एम. लोक व्ही.बी.एच’ या एसएमएस सेवेचा शुभारंभ चंद्रकांत गुंडावार यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य विनोद पांढरे यांनी केले. संचालन माडूरवार यांनी तर आभार प्रा. चंद्रकांत देशपांडे यांनी केले.
यावेळी विद्यार्थी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Information about educational activities of children from SMS service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.