प्रधानमंत्री पीक विमा योजना व स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भूस्खलन, गारपीट, ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे अधिसूचित पिकांचे नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येते. नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाल्यास त्याची माहिती त्या विमा कंपनीला द्यावी. याकरिता शेतकऱ्यांनी क्रॉप इन्शुरन्स ॲप, विमा कंपनी टोल फ्री क्रमांक, विमा कंपनीचा ई-मेल, विमा कंपनीचे तालुकास्तरीय कार्यालय, कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी कार्यालय तसेच ज्या बँकेत विमा जमा केला ती बँक शाखा या पर्यायाचा वापर करावा. नुकसानीबाबतची पूर्वसूचना दिल्यानंतर वैयक्तिक स्तरावर नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे, असे कृषी आयुक्तालयाचे कृषी संचालक विकास पाटील यांनी कळविले आहे.
पिकांचे नुकसान झाल्यास विमा कंपनीला कळवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:31 IST