वीज केंद्रात औद्योगिक सुरक्षितता व ग्रीन बुक सभा
By Admin | Updated: August 7, 2014 23:53 IST2014-08-07T23:53:36+5:302014-08-07T23:53:36+5:30
येथील महाऔष्णिक वीज केंद्रात मार्ग म्युचलएड रीसपोंन्स ग्रुप व ग्रीन बुक तयार करण्याबाबत सभा घेण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण २७ कारखान्यांचे प्रतिनिधीी उपस्थिती होते.

वीज केंद्रात औद्योगिक सुरक्षितता व ग्रीन बुक सभा
‘चंद्रपूर : येथील महाऔष्णिक वीज केंद्रात मार्ग म्युचलएड रीसपोंन्स ग्रुप व ग्रीन बुक तयार करण्याबाबत सभा घेण्यात आली.
चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण २७ कारखान्यांचे प्रतिनिधीी उपस्थिती होते. सर्व औद्योगिक व्यवस्थापनाने आपल्याकडे असलेल्या घातक पदार्थांची माहिती व उपाययोजना तसेच अपघात झाल्यास औद्योगिक व्यवस्थापनात आपल्याकडील उपलब्ध असलेल्या संसाधनाचा उपयोग करुन आपत्ती निवारण करण्यास मदत केल्यास हानी टाळता येवू शकते, हे उद्दिष्ट समोर ठेवून परस्पर मदत सहायता गट स्थापन करण्याचे ठरविण्यात आले. व ग्रीन बुक तयार करण्यासाठी सर्व औद्योगिक प्रतिष्ठानांमध्ये वापरात येणारे घातक पदार्थ व त्यावरील उपाययोजना यांची माहिती गोळा करण्यात आली.
सभेचे आयोजन अतिरिक्त संचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या सभेकरिता चंद्रपुरातील प्रमुख औद्योगिक व्यवस्थापनाचे प्रतिनिधी उपस्थित होते. मार्ग व ग्रीन बुकबाबत संपूर्ण माहिती व मार्गदर्शन औद्योगिक सुरक्षा विभागाचे संचालक मोटघरे यांनी करुन दिली. परस्पर सहायता गट स्थापन झाल्याबद्दल मुख्य अभियंता राजू बुरडे यांनी समाधान व्यक्त केले.आपत्तीकालिन मदत कार्यात चंद्रपूर महाऔष्णिक केंद्र आपल्या संसाधनासह अग्रेसर राहील, अशी ग्वाही दिली.
कार्यक्रमाकरिता उपमुख्य अभियंता सवाईतुल, औद्योगिक सुरक्षा विभागाचे उपसंचालक मोहरकर व आरोग्य विभागाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता विदर्भ सेफ्टी कमिटीचे सचिव देशपांडे, व मसे यांचे सहकार्य लाभले.
संपूर्ण कार्यक्रम मुख्य सुरक्षा अधिकारी श्रावण चव्हाण व अतिरिक्त सुरक्षा अधिकारीएस. जी. गावंडे यांच्यासह चंद्रपूर वीज केंद्राचे वरिष्ठ अधिकारी, सुरक्षितता व प्रशिक्षण विभाग यांच्या सहकार्याने पार पडला. (प्रतिनिधी)