अमेरिकन तंत्रज्ञानाने साकारले जातेयं इनडोअर स्टेडियम

By Admin | Updated: March 3, 2016 00:59 IST2016-03-03T00:59:54+5:302016-03-03T00:59:54+5:30

कोणत्याही समाजाची मूल्ये ही क्रीडा व खेळांद्वारे प्रतिबिंबीत होतात व त्यातूनच समाज घडतो. खेळांमुळे व्यक्तींचा सर्वांगीण विकास होतो.

Indoor Stadiums are run by American technology | अमेरिकन तंत्रज्ञानाने साकारले जातेयं इनडोअर स्टेडियम

अमेरिकन तंत्रज्ञानाने साकारले जातेयं इनडोअर स्टेडियम

भद्रावतीतील खेळाडूत आनंद : नीळकंठराव शिंदे महाविद्यालयाचा उपक्रम
सचिन सरपटवार भद्रावती
कोणत्याही समाजाची मूल्ये ही क्रीडा व खेळांद्वारे प्रतिबिंबीत होतात व त्यातूनच समाज घडतो. खेळांमुळे व्यक्तींचा सर्वांगीण विकास होतो. याच गोष्टींचे महत्व जाणून भद्रावती येथील नीळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयातर्फे अमेरिकन तंत्रज्ञानाच्या आधारे बॅडमिंटन टेबल टेनिससह कुस्ती, तलवार, तायक्वांदो व अन्य खेळांसाठी इनडोअर स्टेडीयम साकारण्यात येत आहे. या इनडोअर स्टेडीअमचे मुख्य आकर्षण म्हणजे अमेरिकन तंत्रज्ञानाच्या आधारे रुफींग व बेडींग मशीनद्वारे स्टेडियमवर टाकण्यात आलेले छप्पर हे आहे.
या बांधकामासाठी महाविद्यालयाला विश्व विद्यालय अनुदान आयोगाकडून ४० लाख रुपये मंजूर झाले असून संस्थेतर्फेसुद्धा २० लाख खर्चून कुस्तीसाठी हॉल बांधण्यात आला आहे. आपल्या क्षेत्रात चांगले खेळाडू तयार व्हावे यासाठी हे स्टेडियम उभारण्यात आल्याचे संस्थेचे सदस्य डॉ. विवेक शिंदे यांनी सांगितले.
बॅडमिंटन हॉलची लांबी २२ मीटर व रुंदी १३ मीटर तर दुसऱ्या हॉलची रुंदी ११ मीटर व लांबी १४.५ मीटर आहे. या इनडोअर स्टेडीयमसाठी छताच्या दृष्टीने गॅलव्हानाईस हे मेटल वापरण्यात आले आहे. या सिटची जाडी ०.८० एम.एम असून रुंदी ९१४ एमएच आहे. रुफींगमध्ये फॅन व लाईटच्या हुकांनी व्यवस्था करण्यात आली असून कंपनीकडून २० वर्षाची हमी देण्यात आली आहे.
इनडोअर स्टेडियमवर छत टाकण्याच्या प्रक्रियेत क्रेन मशीन मुख्य आकर्षण ठरली होती. क्रेनची लिफ्टींग क्षमता ४५ टन तर क्रेनचा बुम ३३.५० मीटर होता. मशिनची रुंदी ४.५० मीटर आहे व यात हायड्रोलिक सिस्टमचा वापर करण्यात आला आहे. रुफींग व बेडींग मशिनद्वारे अवघ्या अर्धा तासात ही रुफींग सिट तयार होऊन ती छप्पर म्हणून टाकण्यात आली. एक प्लेट गॅलव्हानाईझ सिटपासून छप्पर तयार करण्याच्या प्रक्रियेमुळे तर भद्रावतीकर आकर्षित झाले होते, हे पाहण्यासाठी भद्रावतीकरांची एकच झुंबड उडाली होती. अशा प्रकारचे छप्पर टाकण्याचा भद्रावतीतला हा पहिलाच प्रसंग असल्याचे संस्थेचे सदस्य डॉ. कार्तिक शिंदे, डॉ. विशाल शिंदे व अजय आसूटकर यांनी सांगितले.
गॅलव्हानाईस सिटचे छप्परमध्ये कसे रुपांतर होते, हेसुद्धा एक आकर्षण होते. या मशीनवर ओरिसा व झारखंड येथील कामगार काम करीत असल्याचे सुपरवायझर हितेश पटेल व भिमराव मोरे यांनी सांगितले. येत्या एका महिन्यात या इनडोअर स्टेडीयमला सुरुवात होणार असून भद्रावती येथील क्रीडाप्रेमींना ही एक आंनदाची पर्वणीच ठरणार आहे.

Web Title: Indoor Stadiums are run by American technology