भारतापुढे कोरियाचे खडतर आव्हान

By Admin | Updated: September 15, 2015 03:13 IST2015-09-15T03:13:23+5:302015-09-15T03:13:23+5:30

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या सायना नेहवालविना सहभागी होत असल्यामुळे भारतीय बॅडमिंटनपटूंना मंगळवारपासून प्रांरभ होत असलेल्या कोरिया सुपर सिरीज

India will face a tough challenge ahead of Korea | भारतापुढे कोरियाचे खडतर आव्हान

भारतापुढे कोरियाचे खडतर आव्हान

रवी जवळे ल्ल चंद्रपूर
‘इडीयट बॉक्स’चे वेड जसे पूर्वी होते, तसे आजही आहे. उलट हे वेड विविध वाहिन्यांमुळे वाढले आहे. पूर्वी खासगी वाहिन्या कार्यरत नसताना ‘दूरदर्शन’ शिवाय पर्याय नसायचा. घरोघरी दूरदर्शनच बघितले जायचे. आता असंख्य वाहिन्या आल्या असल्या तरी दूरदर्शनची मजा औरच आहे. एका उच्चशक्ती प्रक्षेपण केंद्रासह सात लघुशक्ती व तीन अतिलघुशक्ती प्रक्षेपण केंद्राच्या बळावर चंद्रपूर जिल्ह्यात दूरदर्शनने आपली जादू कायम ठेवली आहे. मात्र रिक्त पदांचे ग्रहण या केंद्रालाही लागले आहे. रिक्त पदांमुळे एखादवेळी तांत्रिक अडचणींचा येथील अधिकाऱ्यांना सामना करावा लागतो.
दिल्ली आणि मुंबईवरून प्रक्षेपित होणारे कार्यक्रम उपग्रहाद्वारे ‘रिसीव्ह’ करणे व येथील ट्रान्समीटरद्वारे त्याची शक्ती वाढवून चंद्रपूर, गडचिरोली व यवतमाळ जिल्ह्यातील काही भागात प्रक्षेपण करणे असे कार्य चंद्रपुरातील दूरदर्शन केंद्रातून सुरू आहे.
पूर्वी चंद्रपूर येथे उच्चशक्ती प्रक्षेपण केंद्र होते. या केंद्राद्वारे केवळ ३५ ते ४० किलोमीटरपर्यंत दूरदर्शनचे कार्यक्रम प्रक्षेपित होत होते. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागात दूरदर्शन दिसायचे नाही. गडचिरोली जिल्ह्यातही दूरदर्शनचे जाळे पसरू शकले नव्हते. मात्र हळूहळू चंद्रपुरातील उच्चशक्ती प्रक्षेपण केंद्राला लघुशक्ती प्रक्षेपण केंद्र जोडण्याचे काम करण्यात आले. १९९९ पर्यंत चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक भागात दूरदर्शन दिसू शकेल, अशी व्यवस्था करण्यात आली.
सद्यस्थितीत अहेरी, भामरागड, सिरोंचा, गडचिरोली, ब्रह्मपुरी, वणी, पांढरकवडा या ठिकाणी लघुशक्ती प्रक्षेपण केंद्र उभारण्यात आले आहे. २० ते २५ किलोमीटरपर्यंत या केंद्राद्वारे दूरदर्शनचे कार्यक्रम पोहचविले जातात. तरीही अनेक भागात दूरदर्शन व्यवस्थित दिसत नसल्याने पुढे चिमूर, सिंदेवाही व कुरखेडा येथे अतिलघुशक्ती प्रक्षेपण केंद्र उभारण्यात आले.
या केंद्रांमुळे प्रक्षेपणाची मर्यादा आणखी १० किलोमीटरने वाढविण्यात आली. लघुशक्ती प्रक्षेपण केंद्रात अधिकारी कार्यरत आहेत. काही तांत्रिक अडचणी आल्या तर तेथील अधिकारी त्याच पातळीवर त्या सोडवितात. मात्र मोठा तांत्रिक बिघाड आला किंवा स्पेअर पार्ट्स बदलायची गरज पडल्यास चंद्रपुरातून अधिकाऱ्यांना स्पेअर पार्ट घेऊन त्या गावी जावे लागत असल्याची माहिती येथील अधिकारी आर.जी. चामाटे व पी.पी. निखार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

केंद्राला रिक्त पदांचे ग्रहण
४चंद्रपुरात दूरदर्शनचे उच्चशक्ती प्रक्षेपण केंद्र व अनुरक्षण केंद्र आहे. या ठिकाणी तांत्रिक कामासह प्रशासकीय कामेही केली जातात. मात्र चंद्रपुरातील उपनिदेशक (अभियांत्रिकी) हे मुख्य पदच अनेक वर्षांपासून रिक्त आहे. नागपूरचे अधिकारी (अभियांत्रिकी) तुलकर यांच्याकडे येथील प्रभार सोपविण्यात आला आहे. याशिवाय लघूशक्ती केंद्रात कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. एका लघूशक्ती केंद्रात किमान आठ अधिकाऱ्यांची गरज आहे. मात्र प्रत्येक केंद्रात अनेक पद रिक्त आहेत. ही परिस्थिती मागील अनेक दिवसांपासून कायम आहे.
असे आहे केंद्रातील मनुष्यबळ
४सद्यस्थितीत चंद्रपुरातील उच्चशक्ती प्रक्षेपण केंद्रात आठ अधिकारी (अभियांत्रिकी) तर अनुरक्षण केंद्रात तीन अधिकारी कार्यरत आहेत. येथे तांत्रिक बाबींसह प्रशासकीय कामेही केली जातात. याशिवाय अहेरी लघुशक्ती केंद्रात चार अधिकारी, भामरागडमध्ये दोन अधिकारी, सिरोंचा येथे पाच अधिकारी, गडचिरोलीमध्ये सात अधिकारी, ब्रह्मपुरीमध्ये पाच अधिकारी, वणी येथे चार अधिकारी तर पांढरकवडा केंद्रात सहा अधिकारी कार्यरत आहेत. अतिलघुशक्ती केंद्रात मात्र अधिकारी वा कर्मचाऱ्यांची गरज नसते. त्यामुळे तेथे कुणीही अधिकारी नसतो.

Web Title: India will face a tough challenge ahead of Korea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.