भारत निर्माण योजना थंडबस्त्यात
By Admin | Updated: February 1, 2015 22:54 IST2015-02-01T22:54:17+5:302015-02-01T22:54:17+5:30
भारत निर्माण योजनेंतर्गत शुद्ध पाणी पुरवठा नळयोजनेनुसार जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये उभ्या केलेल्या पाण्याच्या टाक्या धूळ खात उभ्या आहेत.

भारत निर्माण योजना थंडबस्त्यात
बेंबाळ : भारत निर्माण योजनेंतर्गत शुद्ध पाणी पुरवठा नळयोजनेनुसार जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये उभ्या केलेल्या पाण्याच्या टाक्या धूळ खात उभ्या आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक गावांत सन २००८ मध्ये उभारण्यात आलेले पाण्याच्या टाक्या अजूनपर्यंत पाण्याविना डौलाने उभ्या आहेत. कोणत्याही प्रकारची पाईपलाईन त्यांना जोडण्यात आलेली नाही. या योजनेंतर्गत गावागावांत पाणी पुरवठा करण्यासाठी जी कामे हाती घेण्यात आली, ती सात वर्षे उलटूनही पूर्णत्वास गेलेली नाही. या टाक्या उभारण्याकरिता लाखो रुपयांचा चुराडा करण्यात आला आहे.
भारत निर्माण योजनेंतर्गत शुद्ध पाणी पुरवठा नळयोजना ही सन २००८ मध्ये संतोषसिंग रावत हे जिल्हा परिषद अध्यक्ष असताना अंमलात आणण्यात आली. तत्कालिन ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे तत्कालिन उपअभियंता मडावी यांच्या प्रयत्नातून ही योजना साकार झाली आहे. मात्र या योजनेकडे आजही शासनाचे दुर्लक्ष होत आहे. कित्येक गावात पाण्याची टंचाई व त्यामुळे पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. लवकरच उन्हाळा सुरू होणार आहे. त्यामुळे पाणी टंचाईची झळ बसणार आहे. हा विषय निकाली काढावा, अशी मागणी केली आहे. (वार्ताहर)