विकास आराखडा तयार करण्यासाठी लगबग वाढली

By Admin | Updated: February 15, 2016 01:11 IST2016-02-15T01:11:01+5:302016-02-15T01:11:01+5:30

येथील नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक तसेच नगराध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली.

Increasingly, the development plan was developed | विकास आराखडा तयार करण्यासाठी लगबग वाढली

विकास आराखडा तयार करण्यासाठी लगबग वाढली

विकास कामांचे मोजमाप : नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पुढाकार
गोंडपिपरी: येथील नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक तसेच नगराध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली. चालू आर्थिक वर्षात नवनियुक्त युवा पदाधिकाऱ्यांनी धावपळ करीत शहरातील प्रत्येक प्रभागात जाऊन विकास कामांचे मोजमाप घेणे सुरु केल्याने नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. मात्र विकासकामांसाठी त्यांची ही धावपळ किती दिवस कायम राहते, यावरही बरेच निर्भर आहे.
स्थानिक ग्रामपंचायतीला १७ जून २०१५ रोजी नगरपंचायतीचा दर्जा प्राप्त झाला. तालुकास्तरावरील मोठी ग्रामपंचायत असतानाही शहरातील नागरिकांच्या दैनंनिदन वाढत्या समस्या व मुलभूत गरजा यामुळे शहराला समस्यांचे माहेरघर म्हणून ओळखले जात होते. याच दरम्यान या ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा प्राप्त होताच सार्वत्रीक निवडणुकीमध्ये भाजपाने बाजी मारत गोंडपिपरी नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला. तत्पूर्वी निवडणूकीदरम्यान राज्याचे अर्थ, वने, नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपाला एक हाती सत्ता देण्याचे आवाहन करीत १० कोटींचा विकास निधी देऊ, असे प्रतिपादन केल्याने व आज भाजपाचाच नगराध्यक्ष व उपाध्यक्ष विराजमान झाल्याने शहरातील नागरिकांना आता विकास निधीतून विकास कामांची अपेक्षा आहे.
नगराध्यक्ष व उपाध्यक्ष निवड प्रक्रिया आटपून एका आठवड्याचा कालावधी लोटला असून नवनिर्वाचीत नगराध्यक्ष संजय झाडे, उपाध्यक्ष चेतनसिंह गौर यांनी सहकारी नगरसेवकांना घेऊन प्रत्येक प्रभागात जाऊन अत्यावश्यक असलेल्या विकासकामांचे मोजमाप घेणे व विकास आराखडा तयार करणे यासाठी धडपड चालविली आहे.
आगामी काळात प्राप्त होणाऱ्या विकास निधीतून शहरातील अनेक विकासकामांपैकी रस्ते, नाल्या, बंद गटारे या सर्व मुलभूत गरजांचा विशेष आराखडा तयार केला जात असल्याची माहिती नगरउपाध्यक्ष चेतनसिंह गौर यांनी लोकमतशी बोलताना दिली.
तसेच जनतेनी युवकांच्या हाती कारभार सोपविला असून जनतेच्या अपेक्षांचे ओझे हे फारच जड असून याचीच जबाबदारी पार पाडण्याकरिता पदावर विराजमान होताच पहिल्याच आठवड्यात विकास आराखडा तयार करण्याचा मानस नगराध्यक्ष संजय झाडे यांनी व्यक्त केला. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Increasingly, the development plan was developed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.