ध्वनिप्रदूषण वाढल्याने नागरिकांना त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:27 IST2021-03-19T04:27:19+5:302021-03-19T04:27:19+5:30
जिल्ह्यात अनेक उद्योग आहेत. उद्योगांसोबत लोकसंख्या आणि वाहनांची संख्याही वाढली. उद्योगांतील स्फोटके व सायरणचा आवाजही वाढला. त्यामुळे अवाजवी आवाजाचा ...

ध्वनिप्रदूषण वाढल्याने नागरिकांना त्रास
जिल्ह्यात अनेक उद्योग आहेत. उद्योगांसोबत लोकसंख्या आणि वाहनांची संख्याही वाढली. उद्योगांतील स्फोटके व सायरणचा आवाजही वाढला. त्यामुळे अवाजवी आवाजाचा त्रासही वाढला आहे. आता हा त्रास ध्वनिप्रदूषण म्हणून समोर येत आहे. अनेकदा या वाहतुकीमुळे व त्यांच्या हाॅर्नमुळे नागरिकांना झोप लागत नाही. चित्र-विचित्र हाॅर्नमुळेही ध्वनिप्रदूषण वाढत आहे. यावर आळा घालणे गरजेचे आहे.
ध्वनिप्रदूषण अधिनियम २००० नुसार आवाजाबाबत अनेक नियम लागू करण्यात आले आहे. मात्र, हे नियम कधी कुणी जाणून घेण्याच्या भानगडीत पडत नाही. उलट ते पायदळी तुडविले जात आहे. आधीच जिल्हावासीयांचे जीवनमान जल व वायू प्रदूषणाने कमी करून टाकले आहे. आता ध्वनिप्रदूषणाची भर पडत आहे. याकडे लक्ष देऊन ध्वनी प्रदूषणावर आळा घालण्याची मागणी केली जात आहे.