शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

फिटनेसबाबत वाढली जागरूकता, लाकडी घाण्याच्या तेलाकडे कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 15:46 IST

आरोग्यासाठी लाभदायक : शहरातील नागरिकांकडून मागणी वाढतेय

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पारंपरिक उद्योगांपैकी एक असलेला लाकडी घाणा तेल उद्योगाला आता पुन्हा चांगले दिवस येत आहेत. मधल्या काळात रिफाइंड तेलाच्या वापरामुळे जवळजवळ हा व्यवसाय संपला होता; पण वाढते प्रदूषण, डिजिटल युगात अनेकजण केमिकलविरहित, सेंद्रिय पद्धतीने तयार केलेले तेल वापरणे पसंत करीत आहेत. त्यामुळे पुन्हा ग्रामीणसह शहरी भागातही लाकडी घाण्याला चांगले दिवस येत आहेत. या तेलामुळे आरोग्य सुदृढ राहण्यासही मदत होत आहे.

पूर्वी ग्रामीण भागात तेल काढण्याचे घाणे होते. अनेक व्यावसायिक, त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या मजुरांच्या हाताला देखील काम मिळत होते. बहुतांश शेतकरी शेतात पिकविलेले करडई, सूर्यफूल, शेंगदाणे, तीळ हे गळीत धान्य घाण्यावर नेऊन त्याचे तेल घेत. शिवाय पशुखाद्य म्हणून सरकी, करडी पेंढीचा उपयोग व्हायचा, तसेच केमिकलविरहित तेल खायला मिळत होते. दरम्यान, रिफाइंड तेलाच्या वापरामुळे या व्यवसायाला घरघर लागली; परंतु आरोग्याच्या अनेक समस्यांमुळे शेतकऱ्यांनी स्वतःला व आपल्या कुटुंबाला खाण्याचे शुद्ध तेल मिळावे म्हणून पुन्हा तेलबीयांचे उत्पन्न घेत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी करडई, सूर्यफूल, भुईमूग या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात करीत आहेत. त्यामुळे लाकडी घाण्याच्या तेलाचे प्रमाण देखील वाढत आहे.

तेलाला नैसर्गिक सुगंध, पोषक घटकांचा समावेशघाण्यावर काढलेल्या तेलाला नैसर्गिक सुगंध आणि आवश्यक पोषक घटकांचे उत्तम प्रमाण यामुळे गेल्या काही दिवसांत लाकडी घाण्यावरील तेलाला ग्राहकांची पसंती मिळत आहे. रिफाइंड तेलाच्या तुलनेत घाण्यावरील तेलाची वाढत असलेली मागणी फिटनेसबा- बतच्या जागरूकतेचा नवीन ट्रेंड उदयास येत आहे.

अनेकांच्या हाताला कामलाकडी घाण्यातील तेल प्रक्रियेत गळीत धान्य निवडण्यापासून ते तेल मिळेपर्यंतच्या विविध स्तरांवर कामगारांची आवश्यकता असते. त्यामुळे भागात पुन्हा कामगारांना रोजगार उपलब्ध होत आहे.

मागणी अधिकसध्या लाकडी घाण्याच्या तेलाला बाजारात चांगली मागणी आहे. शेंगदाणा, सूर्यफूल, करडई, तीळ, मोहरी, जवस आदी तेलबीयांचे लाकडी घाण्यामधून तेल काढले जाते.फोडणी देण्यापासून ते भाजी बनवण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी खाद्यतेल गरजेचे असते. खाद्यतेल आणि आरोग्याचा जवळचा संबंध आहे. त्यामुळे कोणते खाद्यतेल आहारात वापरायला हवे हेदेखील महत्त्वाचे ठरते.

चंद्रपूर शहरात आठ ते दहा घाणेघाण्याच्या तेलाची मागणी वाढल्यामुळे चंद्रपूर शहरातील काहींनी घाणीचे तेल काढण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. सद्यस्थितीत चंद्रपूरमध्ये आठ ते दहा घाण्या असून या व्यावसायिकांकडे तेल घेणाऱ्यांची बरीच गर्दी दिसून येते. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स