शुभम अपहरण व हत्याकांडातील आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:22 IST2021-02-20T05:22:32+5:302021-02-20T05:22:32+5:30

घुग्घुस : येथील शुभम फुटाणे अपहरण व हत्या प्रकरणातील आरोपी गणेश पिंपळशेंडेच्या पोलीस कोठडीत पुन्हा दोन दिवसांची वाढ करण्यात ...

Increase in police custody of accused in Shubham abduction and murder | शुभम अपहरण व हत्याकांडातील आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ

शुभम अपहरण व हत्याकांडातील आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ

घुग्घुस : येथील शुभम फुटाणे अपहरण व हत्या प्रकरणातील आरोपी गणेश पिंपळशेंडेच्या पोलीस कोठडीत पुन्हा दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. अपहरणानंतरचे कुठलेही घागेदोरे पोलिसांच्या हाती लागले नाहीत. अपहरणाच्या २८व्या दिवशी आरोपी गणेशला नागपूरहून अटक करून आणले होते. त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली होती. दरम्यान, आरोपी गणेश पिंपळशेंडेची तपास अधिकारी ठाणेदार राहुल गांगुर्डे, पोलीस अधीक्षक, सहायक पोलीस जिल्हा अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेडकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी आपापल्या परीने तपास केला. शुभमचा मृतदेह एका नाल्यात वीटभट्टीच्या राखेने पुरून ठेवला होता. दुसऱ्या दिवशी मोबाईल व त्यानंतर कुऱ्हाड पोलिसांनी जप्त केली. मोबाईल व कुऱ्हाड याच गुन्ह्यातील आहे का, हे निष्पन्न होण्यापूर्वी पोलीस कोठडी संपणार होती. आज आरोपीला न्यायालयात हजर करून कोठडीत वाढ करण्याची मागणी न्यायालयाकडे केली असता दोन दिवसांनी ती वाढवून दिली.

Web Title: Increase in police custody of accused in Shubham abduction and murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.