नागभीड तालुक्यात कुष्ठरुग्णांच्या संख्येत वाढ

By Admin | Updated: April 25, 2016 00:49 IST2016-04-25T00:49:11+5:302016-04-25T00:49:11+5:30

नागभीड तालुक्यात कुष्ठ रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे शासकीय आकडेवारीवरून दिसून येत आहे.

Increase in number of leprosy patients in Nagbhid taluka | नागभीड तालुक्यात कुष्ठरुग्णांच्या संख्येत वाढ

नागभीड तालुक्यात कुष्ठरुग्णांच्या संख्येत वाढ

चिंतेची बाब : आरोग्य विभाग उदासीन
चिखलपरसोडी : नागभीड तालुक्यात कुष्ठ रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे शासकीय आकडेवारीवरून दिसून येत आहे. यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. हा आजार औषधोपचाराने बरा होत असला तरी अनेकजण लाजेखातर हा आजार लपवून ठेवतात. परिणामी आजार बळावत जातो.
शासकीय नोंदीनुसार सन २०१४-१५ या वर्षात १३० रुग्ण असून यामध्ये ० ते १४ वयोगटातील महिला ५१ तर पुरुष ७९ अशी संख्या आहे. यापूर्वीच्या ५ वर्षांपासूनची आकडेवारी पाहता सन २०१० ते ११ रुग्णांची संख्या कमी होण्याऐवजी वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
कागदोपत्री व केवळ जाहिरात करुन या रोगावर प्रतिबंध करता येत नाही. मात्र शासकीय आरोग्य यंत्रणेकडून नेमके तेच केले जात आहे. प्रत्येक खेड्यापाड्यात जावून जनजागृतीच्या माध्यमातून लोकांना याबद्दल अधिक माहिती देणे आवश्यक आहे. तसेच रुग्ण शोधून काढणे गरजेचे आहे. सन २०१० ते ११ या वर्षात तालुक्यामध्ये ८३ रुग्ण होते. ते आज २०१४-१५ या वर्षांपर्यंत १३० च्या घरात रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली आहे. त्यामुळे या विषयात आरोग्य विभाग सपशेल अपयशी ठरला आहे.
या रुग्णांमध्ये २ प्रकारचे रुग्ण असून एमबी म्हणजे संसर्गिक रुग्णांची संख्या ५७ आहे तर पीबी म्हणजे असंसर्गिक ७३ आहेत. यामध्ये ६ रुग्ण विकृती प्रकारामध्ये समाविष्ट आहेत. संसर्गिक प्रकार अतिशय घातक असून रोग पसरण्याची शक्यता अधिक असल्याने त्यांच्यावर वेळीच औषधोपचार होणे अत्यंत गरजेचे असते. परंतु तालुक्यात कुष्ठरोग विभागामध्ये फक्त २ कर्मचारी असून त्यामध्ये १ निम्न वैद्यकीय सहायक व कुष्ठरोग तंत्रज्ञ आहे. त्यांच्यावर इतरही कामाचा बोझा असल्याने पाहिजे त्या प्रमाणात रुग्ण शोधणे शक्य नसल्याची खंत व्यक्त केली. कुष्ठरोग संदर्भ सेवा केंद्राच्या माध्यमातून उपचार करीत असल्याचे मत वैद्यकीय सहाय्यक संदेश खापर्डे यांनी व्यक्त केले. (वार्ताहर)

Web Title: Increase in number of leprosy patients in Nagbhid taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.