चार वर्षांत रक्तदानाच्या संख्येत वाढ
By Admin | Updated: June 15, 2017 00:31 IST2017-06-15T00:31:46+5:302017-06-15T00:31:46+5:30
‘रक्तदान श्रेष्ठदान’ असे म्हटले जाते. मात्र रक्तदानाविषयी भ्रामक कल्पना असल्यामुळे अनेकजण रक्तदान करण्यास टाळतात.

चार वर्षांत रक्तदानाच्या संख्येत वाढ
महिलांचे प्रमाण नगण्य : शिबिरामुळे वाढली संख्या, तरुणांची हिस्सेदारी अधिक
परिमल डोहणे । लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ‘रक्तदान श्रेष्ठदान’ असे म्हटले जाते. मात्र रक्तदानाविषयी भ्रामक कल्पना असल्यामुळे अनेकजण रक्तदान करण्यास टाळतात. मात्र सद्यास्थितीचे चित्र पाहता रक्तदान करणाऱ्याची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. विविध सामाजिक संस्थांनी राबविलेल्या रक्तदान शिबिरामधून तसेच वैयक्तिक रक्तदान करण्याच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामध्ये तरुणाचे प्रमाण अधिक आहे. मात्र महिलांचे प्रमाण नगण्य असल्याचे दिसून येत आहे.
पूर्वी रक्तदानाविषयी अनेक भ्रामक कल्पना होत्या. अपूऱ्या रक्त पुरवठ्यामुळे कुपोषित गर्भधारणा, बाळाच्या जन्मासंबंधी गुंतागुंत प्रसृती दरम्यान गंभीर रक्तत्रास्व यामुळे अनेकांचे जीव गेले. तर वर्षाकाठी मात्र ब्लड बँक, सामाजिक संस्था यांच्यामार्फंत जनजागृती केल्याने रक्तदानाचे महत्त्व नागरिकांना पटले आहे. त्यामुळे रक्तदान करण्याच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येते. सन २०१३ मध्ये विविध ब्लड बँकेद्वारे राबविलेल्या रक्तदान शिबिर व वैयक्तिक रक्तदानाच्या माध्यमातून सन २०१३ मध्ये ५७८० जणांनी रक्तदान केले. त्यामध्ये ५५६१ पुरुषांनी तर २१९ स्त्रीयांनी रक्तदान केले. अशाप्रकारे रक्तदान करणाऱ्यांची संख्या वाढताना दिसून येत आहे.
रक्ताची मागणी वाढली
मानवी रक्ताला कोणताही पर्याय नाही. ते कृत्रिमरित्या तयार होत नाही. तसेच रक्त अधिक काळ साठवून ठेवता येत नाही. वाढते अपघात, वेगवेगळ्या हृदय शस्त्रक्रिया किंवा अनेक आजार व त्यावरील मोठ्या शस्त्रक्रिया, प्रसुतीच्या वेळेस रक्तस्त्रावामुळे झालेली रक्ताची कमतरता अशावेळी रक्ताची नितांत गरज भासते. तसेच कर्करोग, हिमोफिलिया, थॅलेसेमिया, पंडूरोग(अॅनेमिया) या रुग्णांना रक्ताची व रक्तघटकाची मागणी वाढत आहे.ं
रक्तदान करण्यासाठी आवश्यक बाबी
रक्तदान करणाऱ्याचे वय १८ ते ६५ वर्षांचे असावे, त्याचे वजन ४५ किलोपेक्षा जास्त असावे, तसेच रक्तदात्याचे, हिमोग्लोबिन, रक्तदाब योग्य प्रमाणात असणे, आवश्यक आहे. सुदृढ व्यक्ती दर तीन महिन्यातून एकदा रक्तदान करु शकतो.