सावरगाव ग्रामपंचायतीतर्फे विविध कामांचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:26 IST2021-03-19T04:26:54+5:302021-03-19T04:26:54+5:30
सावरगाव येथील ग्रामपंचायतीत नवनिर्वाचित ग्रामपंचायत प्रशासन अलीकडेच अस्तित्वात आले आहे. आणि विविध विकास बांधकामांना सुरुवात करण्यात आली आहे. त्यामध्ये ...

सावरगाव ग्रामपंचायतीतर्फे विविध कामांचा शुभारंभ
सावरगाव येथील ग्रामपंचायतीत नवनिर्वाचित ग्रामपंचायत प्रशासन अलीकडेच अस्तित्वात आले आहे. आणि विविध विकास बांधकामांना सुरुवात करण्यात आली आहे. त्यामध्ये शासनाच्या १४ वा वित्त आयोग अंतर्गत व ७ टक्के वन महसूल अनुदान अंतर्गत येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेला संरक्षण भिंत बांधकाम, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अंतर्गत पुरस्कार रकमेतून विसावा ओटा सौंदर्यीकरण व वटसावित्री ओटा सौंदर्यीकरण आदी बांधकामाचे भूमिपूजन वाढोणा-गिरगांव जिल्हा परिषद क्षेत्राच्या जि. प. सदस्य नयना गेडाम व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सरपंच रवींद्र निकुरे, उपसरपंच प्रवीण खोब्रागडे, ग्रा. पं. सदस्य प्रा. युवराज रामटेके, ग्रा. पं. सदस्य कविता राऊत, ग्रा. पं. सदस्य शिवशंकर सहारे, आशा गेडाम, वंदना सोनवाने, सरिता खोब्रागडे, यामिना मुंगमोडे, विमल राऊत उपस्थित होते.