तुकडोजी महाराज बाल संस्कार केंद्राचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:27 IST2021-04-15T04:27:01+5:302021-04-15T04:27:01+5:30

चंद्रपूर : स्थानिक निर्माणनगर, तुकुम येथील स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्रामधील हॉलमध्ये श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघातर्फे बाल संस्कार ...

Inauguration of Tukdoji Maharaj Bal Sanskar Kendra | तुकडोजी महाराज बाल संस्कार केंद्राचे उद्घाटन

तुकडोजी महाराज बाल संस्कार केंद्राचे उद्घाटन

चंद्रपूर : स्थानिक निर्माणनगर, तुकुम येथील स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्रामधील हॉलमध्ये श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघातर्फे बाल संस्कार केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी बबनराव धर्मपुरीवार, प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, सचिव सोनुले, कार्याध्यक्ष ददगाल, राऊतकर आदींची यावेळी उपस्थिती होती.

याप्रसंगी बबनराव धर्मपुरीवार, प्रमुख अतिथी सुभाष कासनगोट्टूवार यांनी मार्गदर्शन केले.

या बालसंस्कार केंद्राच्या संचालिका ग्रामगीताचार्य वृषाली धर्मपुरीवार यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सभेमध्ये समिसमर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रकाशराव बागडदे, सुरेशराव बुरले, नागोराव लोंनबळे, शामराव वाढई, लक्ष्मण सोनुले, कुलमेटे, तेलंग, गणेशराव बनसोड, पांडुरंग पांढरे, उपासराव भोजेकर, बबनराव विरुटकर, महिला प्रतिनिधी म्हणून सुवर्णा लोखंडे, प्रतिभा रोकडे, आशा झिंगरे, माधुरी बोडेकर, मंगला घटे, श्रुती झिंगरे, प्राप्ती बोढेकर, बोढेकर, प्रजय लोखंडे, पियुष मडावी आदींची उपस्थिती होती.

Web Title: Inauguration of Tukdoji Maharaj Bal Sanskar Kendra