पोलीस-आर्मी भरतीपूर्व प्रशिक्षणाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:25 IST2021-01-17T04:25:07+5:302021-01-17T04:25:07+5:30

चंद्रपूर : जन विकास सेनेतर्फे पोलीस आर्मी भरती पूर्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी दुपारी ४ वाजता ...

Inauguration of Police-Army Pre-Recruitment Training | पोलीस-आर्मी भरतीपूर्व प्रशिक्षणाचे उद्घाटन

पोलीस-आर्मी भरतीपूर्व प्रशिक्षणाचे उद्घाटन

चंद्रपूर : जन विकास सेनेतर्फे पोलीस आर्मी भरती पूर्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी दुपारी ४ वाजता चांदा क्लब ग्राऊंड येथे जिल्ह्यातील ३०० युवकांच्या उपस्थितीत या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

उद्घाटन वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड चंद्रपूर क्षेत्राचे महाप्रबंधक आभासचंद्र सिंह यांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख, मुख्य अतिथी म्हणून सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक श्रीराम तोडासे, प्रमुख अतिथी म्हणून माजी सैनिक उत्थान बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सिद्धार्थ डांगे, सचिव हरीश गाडे, सितादेवी जम्पलवार, माजी सुभेदार प्रभाकर जांभुळकर, फिजिकल ट्रेनर रोशन भुजाडे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक सुरज उराडे, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षक व समुपदेशक अनिल दहागावकर, मार्गदर्शक संजय वासनिक, श्रीराम स्पोर्टचे संचालक संदीप वाढई उपस्थित होते.

संचालन राहुल दडमल, आभार अक्षय येरगुडे यांनी केले. यशस्वीतेसाठी घनश्याम येरगुडे, देवराव हटवार, दिनेश कंपू, इमदाद शेख, गोलू दखने, नामदेव पिपरे, मनीषा बोबडे, निर्मला नगराळे, आकाश लोडे, गीतेश शेंडे, प्रफुल बैरम, अमोल घोडमारे, सतीश येंसाबरे आदींनी प्रयत्न केले.

Web Title: Inauguration of Police-Army Pre-Recruitment Training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.