आॅनलाईन शिष्यवृत्तीचे उद्घाटन

By Admin | Updated: March 3, 2016 01:12 IST2016-03-03T01:12:22+5:302016-03-03T01:12:22+5:30

चंद्रपूर जिल्ह्यातील गरजू व हुशार विद्यार्थ्यांकरिता पुढील शैक्षणिक सत्रापासून एसीसी व एन.एस.डी.एल.ई. गव्हर्नस ...

Inauguration of online scholarship | आॅनलाईन शिष्यवृत्तीचे उद्घाटन

आॅनलाईन शिष्यवृत्तीचे उद्घाटन

घुग्घुस : चंद्रपूर जिल्ह्यातील गरजू व हुशार विद्यार्थ्यांकरिता पुढील शैक्षणिक सत्रापासून एसीसी व एन.एस.डी.एल.ई. गव्हर्नस इन्फ्रास्ट्रक्चर लिमीटेडच्या संयुक्त विद्यमानाने ‘विद्यासारथी’ नावाने शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. या शिष्यवृत्ती योजनेचा शुभारंभ येथील एसीसीच्या इडमिस्टेटीव्ह बिल्डींगमध्ये जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांचे हस्ते पार पडले.
यावेळी एसीसीचे पश्चिम व मध्य विभागाचे क्लस्टर हेड गोपिका तिवारी, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे माजी कुलगुरू डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित, डॉ. इंगोले यांची प्रमुख उपस्थिती होती. एसीसी विविध सामाजिक बांधिलकी जोपासून जलयुक्त शिवार, कौशल्य विकास, महिलांना उद्योग, शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांना विविध योजना राबवित आहे. तर पुढील सत्रापासून डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर कोर्स करणाऱ्या व अन्य विद्यार्थ्यांकरीता ‘विद्यासारथी’ नावाची आॅनलाईन शिष्यवृत्ती योजना राबविणार असल्यामुळे सारथी ज्याप्रमाणे रथाला दिशा देतो, त्याप्रमाणे ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास दिशा मिळवून देणारी ठरणार आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी यावेळी सांगितले.
ही योजना पुढील शैक्षणिक सत्रापासून डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता असून विद्यार्थ्यांना २६ फेब्रुवारी ते २५ मार्चपर्यंत आॅनलाईन अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे, अशी माहिती सी.एस.आर.चे प्रमुख विजय खटी यांनी दिली. (वार्ताहर)

Web Title: Inauguration of online scholarship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.