महाकाली यात्रा मनपा कार्यालयाचे उद्घाटन
By Admin | Updated: April 12, 2017 00:59 IST2017-04-12T00:59:32+5:302017-04-12T00:59:32+5:30
चंद्रपूरचे आराध्य दैवत माता महाकालीची यात्रा सुरु झाली असून भाविकांसाठी उघडण्यात आलेल्या मनपाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

महाकाली यात्रा मनपा कार्यालयाचे उद्घाटन
चंद्रपूर : चंद्रपूरचे आराध्य दैवत माता महाकालीची यात्रा सुरु झाली असून भाविकांसाठी उघडण्यात आलेल्या मनपाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या यात्रेच्या निमित्ताने हजारो भाविक यात्रेला येत असतात.
या कार्यालयाचे उद्घाटन सहाय्यक आयुक्त महानगर पालिका तथा समन्वय अधिकारी (यात्रा) सचिन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सर्वप्रथम माता महाकालीच्या प्रतिमेची पूजा करुन पुष्पमाला अर्पण करण्यात आली. त्यानंतर फीत कापून रितसर उद्घाटन करण्यात आले. यावेळी सहायक आयुक्त अश्विनी गायकवाड, शीतल वाकडे, नगर अभियंता महेश बारई, फोन अभियंता अनिल घुमडे, नोडल अधिकारी डॉ. अंजली आंबटकर, प्रभाग अधिकारी नरेंद्र बोबाटे, अतिक्रमण अधिकारी नामदेव राऊत, स्वच्छता निरीक्षक विवेक पोतनुरवार, भूपेश गोठे, उदय मैलारपवार, संतोष गर्गेलवार, महेंद्र हजारे, प्रदीप मडावी, भांडारपाल, विकास दानव, महाकाली मंदिराचे विश्वस्त सुनील महाकाले, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंचोळकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)