चंद्रपूर पोलीस विभागाच्या वाचनालयाचे उद्घाटन
By Admin | Updated: April 17, 2016 00:46 IST2016-04-17T00:46:42+5:302016-04-17T00:46:42+5:30
चंद्रपूर जिल्हा पोलीस कल्याण निधी अंतर्गत शनिवारी पोलीस मुख्यालय येथे चंद्रपूर पोलिसांच्य पाल्याकरिता ‘कैवल्य’ ....

चंद्रपूर पोलीस विभागाच्या वाचनालयाचे उद्घाटन
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा पोलीस कल्याण निधी अंतर्गत शनिवारी पोलीस मुख्यालय येथे चंद्रपूर पोलिसांच्य पाल्याकरिता ‘कैवल्य’ वाचनालयाचे उद्घाटन नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम यांच्या हस्ते पार पाडले.
सदर कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दीवाण, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत, पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) जयचंद्र काठे, परीविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सुशीलकुमार नायक, राखीव पोलीस निरीक्षक रघुनाथ चौधरी, पोलीस निरीक्षक दीपक वंजारी, पोलीस निरीक्षक जयवंत पगारे तसेच पोलीस वसाहतीतील विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते. जिल्हा पोलीस दलातील पोलीस व त्यांच्या पाल्यांकरिता अभ्यासासाठी सोयस्कर एक व्यासपीठ असावे, तसे स्पर्धा परीक्षांकरिता अभ्यासाची साधणे एकत्रीत उपलब्ध व्हावे, या हेतूने सदर वाचनालयाची निर्मिती करण्यात आली आहे. वाचनालयात वर्तमानपत्रे, विविध मासिक तसेच स्पर्धा परीक्षांची पुस्तके व आसन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)