गोंडपिंपरीत ‘ई-लायब्ररी’चे उद्घाटन

By Admin | Updated: September 8, 2015 00:49 IST2015-09-08T00:49:38+5:302015-09-08T00:49:38+5:30

स्थानिक नगर पंचायत अंतर्गत नागरिकांना सेवा देणाऱ्या महात्मा गांधी वाचनालय इमारतीत शिक्षक दिनाचे औचित्य साधून शनिवारी ‘ई-लायब्ररी’चे उद्घाटन पार पडले.

Inauguration of 'E-Library' in Gondipampur | गोंडपिंपरीत ‘ई-लायब्ररी’चे उद्घाटन

गोंडपिंपरीत ‘ई-लायब्ररी’चे उद्घाटन

जिल्ह्यातील प्रथम सेवा : विद्यार्थ्यांना पडणार उपयोगी
गोंडपिंपरी : स्थानिक नगर पंचायत अंतर्गत नागरिकांना सेवा देणाऱ्या महात्मा गांधी वाचनालय इमारतीत शिक्षक दिनाचे औचित्य साधून शनिवारी ‘ई-लायब्ररी’चे उद्घाटन पार पडले. अशा प्रकारची जिल्ह्यातील ही पहिलीच लायब्ररी आहे.
कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटक म्हणूून उपविभागीय अधिकारी चंद्रभान पराते होते. प्रमुख अतिथी म्हणून नगर पंचायत प्रशासक तथा तहसीलदार मलिक विराणी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेची पूजा करुन करण्यात आली. यावेळी बोलताना उपविभागीय अधिकारी पराते म्हणाले, मानवी जीवनाचा ग्रंथालय अविभाज्य घटक असून येथे सर्व प्रकारचे ज्ञानार्जन करता येते. ‘वाचाल तर वाचाल’ असा संकल्प प्रत्येक विद्यार्थ्यांने करुन ग्रंथालयाच्या माध्यमातून ज्ञान प्राप्त करून उज्वल भविष्य घडवावे, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
ई- लायब्ररी ही काळाची गरज असून येथे लवकरच दहा संंगणक संच उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी पराते यांनी दिली. तर प्रास्ताविकामध्ये तहसीलदार मलिक विराणी यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले, ग्रंथालय हे एक पवित्र ज्ञानार्जन स्थान असून प्रत्येक मानसाने व विद्यार्थ्यांने वाचनातूनच प्रगतीच्या वाटेवरील अडचणींचा सामना करण्याची जिद्द व शक्ती ते प्राप्त करु शकतात. आणि भविष्य उज्ज्वलमय घडवू शकतात, असे ते म्हणाले.
या लायब्ररीचा विद्यार्थ्यांनी चांगला उपयोग करावा, नक्कीच लायब्ररीचा फायदा होईल, असेही तहसीलदारांनी सांगितले. याप्रसंगी प्रामुख्याने गावातील बहुतांश प्रतिष्ठित नागरिक, नगर पंचायत कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन बंडू झाडे, प्रास्ताविक तहसीलदार तथा प्रशासक मलिक विराणी यांनी तर आभार ग्रंथपाल आनंद वनकर यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Inauguration of 'E-Library' in Gondipampur