रोटरी क्लब भद्रावतीचा पदग्रहण सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:19 IST2021-07-21T04:19:33+5:302021-07-21T04:19:33+5:30
कोविड प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सर्व निर्देश पाळून सेलिब्रेशन सभागृहामध्ये झालेल्या कार्यक्रमात सचिन सरपटवार यांनी माजी अध्यक्ष विनोद कामडी यांच्याकडून अध्यक्षपदाचा ...

रोटरी क्लब भद्रावतीचा पदग्रहण सोहळा
कोविड प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सर्व निर्देश पाळून सेलिब्रेशन सभागृहामध्ये झालेल्या कार्यक्रमात सचिन सरपटवार यांनी माजी अध्यक्ष विनोद कामडी यांच्याकडून अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला, तर माजी सचिव प्रवीण महाजन यांच्याकडून अब्बास अजानी यांनी स्वीकारला.
रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३०३०चे डिस्ट्रिक्ट गवर्नर रमेश मेहेर या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, तर विशेष अतिथी म्हणून राजिंदर खुराना, प्रशांत भोरे, कीर्ती चांदे उपस्थित होते. यावेळी इनरव्हील क्लबचा पदग्रहण सोहळा पार पडला. अध्यक्ष म्हणून सुनंदा खंडाळकर यांनी जयश्री कामडी यांच्याकडून तर सचिव म्हणून मनिषा ढोमने यांनी पदभार ग्रहण केला, तसेच कोरोना योद्धा म्हणून डॉ. विवेक शिंदे, डॉ.अमित प्रेमचंद, नगराध्यक्ष अनिल धानोरकर आणि प्रकाश पिंपळकर, योगिता घोडे यांचा सत्कार करण्यात आला.