रोटरी क्लब भद्रावतीचा पदग्रहण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:18 IST2021-07-19T04:18:40+5:302021-07-19T04:18:40+5:30

भद्रावती : रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे प्रांतपाल रमेश मेहेर यांच्या उपस्थितीत प्रा. सचिन सरपटवार यांनी रोटरी क्लब ...

Inauguration Ceremony of Rotary Club Bhadravati | रोटरी क्लब भद्रावतीचा पदग्रहण सोहळा

रोटरी क्लब भद्रावतीचा पदग्रहण सोहळा

भद्रावती : रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे प्रांतपाल रमेश मेहेर यांच्या उपस्थितीत प्रा. सचिन सरपटवार यांनी रोटरी क्लब ऑफ भद्रावतीचे अध्यक्ष म्हणून तर अब्बास अजानी यांनी सचिव म्हणून एका सोहळ्यात पदभार स्वीकारला.

कोविड प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सर्व निर्देश पाळून सेलेब्रेशन सभागृहात मध्ये झालेल्या कार्यक्रमात सचिन सरपटवार यांनी माजी अध्यक्ष विनोद कामडी यांच्याकडून अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. तर माझी सचिव प्रवीण महाजन यांच्याकडून अब्बास अजानी यांनी स्वीकारला.

रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३०३० चे डिस्ट्रिक्ट गवर्नर रमेश मेहेर या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते तर विशेष अतिथी म्हणून राजिंदर खुराना, प्रशांत भोरे, कीर्ती चांदे उपस्थित होते. यावेळी इनरव्हील क्लबचा पदग्रहण सोहळा पार पडला. अध्यक्ष म्हणून सुनंदा खंडाळकर यांनी जयश्री कामडी यांच्याकडून तर सचिव म्हणून मनीषा ढोमने यांनी पदभार ग्रहण केला.

तसेच कोरोना योद्धा म्हणून डॉ. विवेक शिंदे, डॉ. अमित प्रेमचंद, नगराध्यक्ष अनिल धानोरकर आणि प्रकाश पिंपळकर, योगिता घोडे यांचा सत्कार करण्यात आला.

180721\img-20210718-wa0001_1626587940084.jpg~180721\img-20210718-wa0000_1626587940084.jpg

फोटो~पदग्रहण समारंभ

Web Title: Inauguration Ceremony of Rotary Club Bhadravati