जेसीआय राजुरा रॉयल्सचा पदग्रहण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:26 IST2021-01-18T04:26:19+5:302021-01-18T04:26:19+5:30

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून झोन अध्यक्ष अनुप गांधी, माजी अध्यक्ष भरत बजाज, झोन उपाध्यक्ष शिवराज टेकाडे, जयश्री शेंडे, सुषमा ...

Inauguration Ceremony of JCI Rajura Royals | जेसीआय राजुरा रॉयल्सचा पदग्रहण सोहळा

जेसीआय राजुरा रॉयल्सचा पदग्रहण सोहळा

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून झोन अध्यक्ष अनुप गांधी, माजी अध्यक्ष भरत बजाज, झोन उपाध्यक्ष शिवराज टेकाडे, जयश्री शेंडे, सुषमा शुक्ला, रेखा बोढे आदी उपस्थित होते. या सोहळ्यात नवनिर्वाचित अध्यक्ष स्मृती व्यवहारे यांना पदाची शपथ देऊन सूत्रे सोपविण्यात आली. यावेळी झोन अध्यक्ष अनुप गांधी म्हणाले, कोरोनाकाळात संपूर्ण जग महामारीच्या विळख्यात असताना जेसीआयच्या सर्व सदस्यांनी गरजूंना मदत करून चांगले कार्य केले आहे. मानवजातीचे कल्याण हाच आपला मुख्य उद्देश असल्याचे मत गांधी यांनी मांडले. या कार्यक्रमात नवनिर्वाचित अध्यक्ष स्मृती व्यवहारे यांनी कार्यकारिणीच्या सचिव सुशीला पोरेड्डीवार, उपाध्यक्ष प्रफुल्ला धोपटे, कोषाध्यक्ष मधुस्मिता पाढी, सहसचिव मोनिशा पाटणकर यांना पदाची शपथ दिली. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सदस्य उपस्थित होते.

Web Title: Inauguration Ceremony of JCI Rajura Royals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.