जेसीआय राजुरा रॉयल्सचा पदग्रहण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:32 IST2021-01-16T04:32:18+5:302021-01-16T04:32:18+5:30

बल्लारपूर : येथील जेसीआय राजुरा रॉयल्सचा पदग्रहण सोहळा शनिवारी सायंकाळी ५ वाजता शासकीय विश्रामगृह बल्लारपूर येथे पार पडला. यावेळी ...

Inauguration Ceremony of JCI Rajura Royals | जेसीआय राजुरा रॉयल्सचा पदग्रहण सोहळा

जेसीआय राजुरा रॉयल्सचा पदग्रहण सोहळा

बल्लारपूर : येथील जेसीआय राजुरा रॉयल्सचा पदग्रहण सोहळा शनिवारी सायंकाळी ५ वाजता शासकीय विश्रामगृह बल्लारपूर येथे पार पडला.

यावेळी झोन अध्यक्ष अनुप गांधी, माजी झोन अध्यक्ष भरत बजाज, झोन उपाध्यक्ष शिवराज टेकाडे, जयश्री शेंडे, सुषमा शुक्ला, सचिव रेखा बोढे, प्रफुल्ल धोपटे, मधुस्मिता पाढी, सुशिला पोरेड्डीवर, मोनिशा पाटणकर उपस्थित होते. यावेळी सुषमा शुक्ला यांनी २०२० मध्ये जेसीआय राजुरा रॉयल्सद्वारा केल्या गेलेल्या कार्याची रिपोर्ट मांडली. २०२० मधील प्रोजेक्टमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्यां सदस्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. नवनिर्वाचित अध्यक्ष स्मृती व्यवहारे यांना माजी अध्यक्ष सुषमा शुक्ला यांच्याकडून अध्यक्षपदाची शपथ देण्यात आली. कार्यकारणीमध्ये कोषाध्यक्ष मधुस्मिता पाढी, सचिव सुशिला पोरेड्डीवर, उपाध्यक्ष प्रफुल्ल धोपटे, सहसचिव मोनिशा पाटणकर आदी सदस्यांना नवनिर्वाचित अध्यक्ष स्मृती व्यवहारे यांनी शपथ दिली.

Web Title: Inauguration Ceremony of JCI Rajura Royals