बल्लारपूर वूड सिटी जेसीआयचा पदग्रहण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:23 IST2021-01-15T04:23:45+5:302021-01-15T04:23:45+5:30

बल्लारपूर : जेसीआय बल्लारपूर वूड सिटीचा पदग्रहण सोहळा येथील बालाजी मंगल कार्यालयात उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे ...

Inauguration Ceremony of Ballarpur Wood City JCI | बल्लारपूर वूड सिटी जेसीआयचा पदग्रहण सोहळा

बल्लारपूर वूड सिटी जेसीआयचा पदग्रहण सोहळा

बल्लारपूर : जेसीआय बल्लारपूर वूड सिटीचा पदग्रहण सोहळा येथील बालाजी मंगल कार्यालयात उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बीजीपीपीएलचे उदय कुकडे, जेसीआयचे झोन अध्यक्ष अनुप गांधी, झोन उपाध्यक्ष अक्षय तूघनायत, नॅशनल कौन्सिल मेंबर अमर गांधी यांची उपस्थिती होती. पदग्रहण सोहळ्यात जेसीआय अध्यक्ष नंदकिशोर किरणापुरे यांनी नवे अध्यक्ष सुनील जैन यांना जेसीसची कालर घालून जेसीआयचा पदभार सोपविला. यावेळी अनुप गांधी यांनी नवीन कार्यकारिणीची घोषणा करून त्यांना जेसीआयची शपथ दिली. नवीन कार्यकारिणीमध्ये सचिव गौरव खंडेलवाल, कोषाध्यक्ष अश्विन खंडेलवाल, मनीष मालू, गौरव मामीडवार, विकास राजूरकर, पवन बोप्पनवार, अमित गिडवाणी, मनोज खत्री, भावेश चव्हाण व इतर सदस्यांचा समावेश आहे.

प्रास्ताविक भाषणात नंदकिशोर किरणापुरे यांनी वर्षभराचा अहवाल प्रस्तुत केला. संचालन आयुषी बुग्गावार व जयंत गिडवाणी यांनी केले तर आभार गौरव खंडेलवाल यांनी मानले.

Web Title: Inauguration Ceremony of Ballarpur Wood City JCI