बौद्ध धम्म महोत्सवाचे थाटात उद्घाटन
By Admin | Updated: May 21, 2017 00:33 IST2017-05-21T00:33:07+5:302017-05-21T00:33:07+5:30
विजासन बुद्धलेणी ट्रस्ट भद्रावतीच्या वतीने शनिवारी धम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले.

बौद्ध धम्म महोत्सवाचे थाटात उद्घाटन
रॅलीने परिसर दणाणला : धम्मध्वज घेतलेले शेकडो मोटारसायकलस्वार ठरले आकर्षण
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : विजासन बुद्धलेणी ट्रस्ट भद्रावतीच्या वतीने शनिवारी धम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते ऐतिहासिक बुद्धलेणीपर्यंत ही धम्म रॅली काढण्यात आली. तथागत भगवान गौतम बुद्ध की जय तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, या पंचशील ध्वज की जय आदी जयघोषाने परिसर दणाणून गेला होता.
बौद्ध धम्म महोत्सवासाठी तयार करण्यात आलेल्या स्वागतद्वाराने सगळ्यांचे लक्ष वेधले. रॅलीसाठी बौद्ध उपासक व उपासिका डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवह एकत्रित आले होते. त्यानंतर प्रमुख अतिथी भदन्त सुरेई ससाई यांना मिरवणुकीद्वारे कार्यक्रस्थळी आणण्यात आले. शेकडो मोटारसायकलस्वार धम्मध्वज घीवून रॅलीच्या समोर होते. ही रॅली शहरातील प्रमुख मार्गानी निघून बुद्ध लेणी येथे पोहचल्यानंतर बुद्धदेसना देण्यात आली. त्यानंतर पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करून पर्यटननिवास व भिक्खूनिवास या स्थळांचे भूमिपूजन भंते सुरई सलाई यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यानंतर बौद्ध धम्म महोत्सवाच्या उद्धाटन कार्यक्रमाला सुरूवात झाली. याप्रसंगी धम्म मंचावर उद्घाटक भंते सुरई ससाई, डॉ. विमलकीर्ती गुणसिरी, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष व विजासन बुध्देलेणी ट्रस्टचे अध्यक्ष सुशील देवगडे, ट्रस्टचे ज्येष्ठ सल्लागार राजू देवगडे, कुशल मेश्राम, सचिव पवन गौरकार, हरीश दुर्योधन आदी उपस्थित होते. रॅलीमध्ये मिलिंद शेंडे, इंद्रपाल पाझारे, संस्थापेटकर, रत्नाकर साठे, लात टिपले, अमित फुलझेले, रजनीकुंटा रायपुरे, सुधाकर शंभरकर, नीला थुलकर, सूरज गावंडे, रमाकांत मेश्राम, राजु गावंडे, लता देवगडे, वैशाली चिमुरकर, दर्शना पाटील, सदानंद वाघ, महेन्द्र गावंडे, मनोज मोडक, भास्कराव देशभ्रतार, लिला जांभुळे, गीता वाळके, दीपक ढेंगळे, यादव चाहारे, सातपुते आदी उपस्थित होते.